आजी, माजी आमदारांची गोची...

सुनील पाटील
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

ग्रामपंचायत निवडणूक - भाऊबंदकी, गट-तटांच्या हालचाली गतिमान

कोल्हापूर - जिल्ह्यातील ४७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या वर्षीपासून थेट जनतेतूनच सरपंच निवडला जाणार असल्याने गावागावांतील स्वंयघोषित समाजसेवक आतापासूनच कामाला लागले आहे. तर, गावपातळीवरील गट-तट आणि भाऊ बंदकीचा विचार करून पॅनेल कसे व कोणा-कोणाचे करायचे याच सूत्रबद्ध नियोजन सुरू आहे, यामध्ये विद्यमान आणि माजी आमदारांना कोणाची बाजू घेऊन उतरायचे ही गोची होणार आहे. 

ग्रामपंचायत निवडणूक - भाऊबंदकी, गट-तटांच्या हालचाली गतिमान

कोल्हापूर - जिल्ह्यातील ४७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या वर्षीपासून थेट जनतेतूनच सरपंच निवडला जाणार असल्याने गावागावांतील स्वंयघोषित समाजसेवक आतापासूनच कामाला लागले आहे. तर, गावपातळीवरील गट-तट आणि भाऊ बंदकीचा विचार करून पॅनेल कसे व कोणा-कोणाचे करायचे याच सूत्रबद्ध नियोजन सुरू आहे, यामध्ये विद्यमान आणि माजी आमदारांना कोणाची बाजू घेऊन उतरायचे ही गोची होणार आहे. 

१४ ऑक्‍टोबरला मतदान व १६ ऑक्‍टोबरला मतमोजणी होणार आहे. यातून ४ हजार ३९० सदस्य निवडले जाणार आहे. भाजपच्या सत्तेनंतर जिल्ह्यात दुसऱ्यांदा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. दरम्यान, गेल्या अडीच ते तीन वर्षाच्या कालावधीत ग्रामपंचायतींमध्ये आपली सत्ता असली पाहिजे, हा एकच नारा भाजपने आळवला आहे. त्याला सत्यात उतरण्यासाठी गावपातळीवर फलक लावणे, शाखा काढण्याच्या कामांनी गती घेतली आहे. दरम्यान, सत्ता कोणाचीही आली तरीही सरपंच हा थेट जनतेतूनच निवडायचा आहे. त्यामुळे निवडणुकीला विशेष महत्त्‍व आहे.

वास्तविक ग्रामपंचायत कोणत्या गटाकडे राहते, यावरही आमदारकीच्या निवडणुकीचे अंदाज बांधले जातात. ज्या पक्षाचा किंवा नेत्याची जास्त गावात सत्ता येते त्या ठिकाणी संबधित आमदार, खासदाराला भविष्यातील राजकारण सोयीचे ठरते. तरीही एखाद्या गावात कोणाच्या गटाकडून आपली भूमिका मांडायची हे कसरतीचे ठरू शकते. त्यामुळे विद्यमान किंवा माजी आमदारांना कोणाच्या बाजूने उभे राहायचे हे संकट ओढवलेले असते. सर्वच तालुक्‍यात हीच परिस्थिती असल्याने जे गट-तट किंवा भाऊबंद ठरवतात तेच होऊ दे म्हणून आमदार, खासदारांना यापासून अलिप्त राहवे लागणार आहे. 

मतदान होणाऱ्या ग्रामपंचायती : ४७८
मतदान : १४ ऑक्‍टोबर
मतमोजणी : १६ ऑक्‍टोबर
निकाल : १७ ऑक्‍टोबर 
अर्ज भरण्याचा कालावधी : २२ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर (सकाळी ११.०० ते ४.३०)
छाननी : ३ ऑक्‍टोबर  (सकाळी ११ पासून छाननी संपेपर्यंत)
माघारीची अंतिम मुदत : ५ ऑक्‍टोबर ( दुपारी ३ पर्यंत)
निवडणूकसाठी चिन्ह देणे व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे - ५ ऑक्‍टोबर (दुपारी ३ नंतर)

निवडणूक जाहीर झालेली तालुकानिहाय गावे आणि तेथील सदस्यसंख्या

करवीर - ५३ पंचायती - ५८७ सदस्‍य
चिखली, कसबा बीड, शिळकेवाडी, उजळाईवाडी, पाचगाव, आंबेवाडी, हिरवडे खालासा, जैताळ, मांडरे, सावर्डे दुमाला, नंदवाळ, उंचगाव, कांचनवाडी, हणबरवाडी, दिंडनेर्ली, दऱ्याचे वडगाव, सांगरूळ, वाकरे, वळीवडे, कांडगाव, भांटणवाडी, सांबरवाडी, बोलोली, कंदलगाव, चुये, परिते, म्हाळुंगे, सोनाळी, नेर्ली, वसगडे, सादळे-मादळे, नागाव, पासर्डे, सडोली दुमाला, कावणे, गोकुळ शिरगाव, हसुर दुमाला, कणेरी, भुये, वरणगे, गांधीनगर, वडणगे, कळंबे तर्फ ठाणे, दोनवडे, आरळे, सरनोबतवाडी, चिंचवडे तर्फ कळे, कणेरीवाडी, हिरवडे दुमाला. 

कागल - २६ ग्रामपंचायती - २४० सदस्‍य 
अर्जुनवाडा, अवचितवाडी, आणूर, करड्याळ, कसबा सांगाव, कापशी/बाळीक्रे, चिमगाव, जैन्याळ, ठाणेवाडी, दौलतवाडी, निढोरी, नंद्याळ, पिराचीवाडी, फराकटेवाडी, बाचणी, बामणी, बाळेघोल, बेलेवाडी काळम्मा, बोळावी, बोरवडे, मुगळी, रणदेवीवाडी, व्हनाळी, हणबरवाडी, हासुर ब्रुदुक, हमिदवाडा.

हातकणंगले - ४० पंचायती - ५३२ सदस्‍य
अंबप, अंबपवाडी, भेंडवडे, भादोले, चोकाक, चावरे, घुणकी, हेर्ले, नरंदे, नागाव, जुने पारगाव, नवे पारगाव, निलेवाडी, सावर्डे, कापूरवाडी, शिरोली पुलाची, तळसंदे, टोप, संभापूर, कासारवाडी, मौजे वडगाव, अतिग्रे, आळते, लक्ष्मीवाडी, हातकणंगले, हिंगणगाव, इंगळी, कोरोची, मजले, माले, मुडशिंगी, पट्टणकोडोली, रांगोळी, रूकडी, साजणी, तारदाळ, खोतवाडी, यळगुड, तळंदगे, रेंदाळ. 

चंदगड - ४१ ग्रामपंचायत - ३२१ सदस्‍य
आडकूर, अलबादेवी, चंदगड, दुंडगे, ढेकोळी, डुक्करवाडी, गुडवळे खालसा, गवसे, हल्लारवाडी, हेरे, हिडगाव, जंगमहट्टी, जिलगुंडे, कडलगे बुद्रुक, कागणी, काजिर्णे/म्हाळुंगे, करंजगाव, कणसेवाडी, कच्चेवाडी, कोकरे/आडूरे, कोलिक, कोळंद्रे खालासा, काणेवाडी, कोरज, कदणूर, लकीकट्टे, महिपाळगड, म्हाळुंगे खालसा, मोटणवाडी, नागनवाडी, नागरदळे, निट्टूर, पार्ले, राजगोळी खुर्द, सरोळी, सातवणे, शिनोळी बुद्रुक, शिरगाव, तडशिनहाळ, तेऊरवाडी, विझणे, आसगोळी. 

भुदरगड - ४४ ग्रामपंचायती - ३५८ सदस्‍य
आकुर्डे, अरगुंडी, अतिवडे, आतुरली, अनफ खुर्द, कडगाव, करडवाडी, कुर, कारीवडे, कोळवण, कोनवडे, टिकेवाडी, तांबळे, तिरवडे, दारवाड, दिंडेवाडी, देवर्डे, देवकेवाडी, देवूळवाडी, न्हाव्याचीवाडी, पडखंबे, पाल, पारधेवाडी, पाचवडे, पिंपळगाव, पुष्पनगर, भाटीवडे, महालवाडी, मडिलगे खुर्द, मडिलगे बुद्रुक, मडूर, मानवळे, मिणचे बुद्रुक, मुदाळ, राणेवाडी, वाघापूर, वेंगरूळ, वेसर्डे, वरपेवाडी, शेणगाव, शिळोली, सोनारवाडी, हेदवडे, व्हनगुत्ती.  

शिरोळ - १७ पंचायती - १९३
औरवाड, कवटेसार, कणवाड, चिंचवाड, उमळवाड, संभाजीपूर, अकीवाट, अब्दुललाट, लाटवाडी, नवे दानवाड, टाकवडे, राजापूर, राजापूरवाडी, शिवनाकवाडी, हरोली, हिरवाड व खिद्रापूर 

गगनबावडा - २१ पंचायती - १५५
ंडकुर्ली, खोकुर्ले, तळये बुदुक, मार्गेवाडी, अणदुर, साखरी म्हाळुंगे, खैरीवडे, कडवे, बावेली, तिसंगी, जर्गी, शिळोशी, निवडे, बोरवडे, कांदे बुद्रुक, धुंदवडे, वसर्डे, असळज, शेणवडे, मणदुर व साळवण. 

राधानगरी : ६६ पंचायती ः ५६६
अर्जुनवाडा, आपटोळे, आमजाई व्हरवडे, आवळी खुर्द, आवळी बुद्रुक, ओलवण, आटेगाव, आकनुर, बनाचीवाडी, चाफोडी तर्फ तारळे, चंद्रे, चांदे, दुर्गमानवाड, धामणवाडी, धामोड लाडवाडी, ढेगेवाडी, घोटवडे, घुडेवाडी, हसणे, कुंभारवाडी, कुडूत्री, केळोशी बुद्रुक, केळोशी खुर्द, कसबा तारळे, करंजफेण, कपिलेश्‍वर, कारीवडे, कासारपुतळे, कोते, कांबळवाडी, खामकरवाडी, मौजे कासारवाडी, मल्लवाडी, मुसळवाडी, मोघुर्डे, मोहडे, मेजर कासारवाडी, माणबेट, मांगोली, पडसाळी, पडळी, पुंगाव, पिरळ सार्वधन, पिंपळवाडी, पाटपन्हाळा, राधानगरी, राशिवडे बुद्रुक, राशिवडे खुर्द, सो. शिरोली, सोळांकूर, सुळबी, सावर्डे पाटणकर, सिरसे, शिळेवाडी, शिरगाव, तळगाव, तरसंबळे, तरंबे, तारळे खुर्द, ठिकपूर्ली, येळवडे, वाघोली, आडोली व तिटवडे. 

गडहिंग्लज - ३४ पंचायती - ३००
बड्याचीवाडी, बटकणंगले, बेकनाळ, भडगाव, बिद्रेवाडी, डोणवाडी, हडलगे, हरळी खुर्द, हसुरवाडी, हसुर सासगिरी, हिडदूगी, हिटणी, जखेवाडी, कडाल, कडेगाव, कडलगे, करंबळी, कवळीकट्टी, खमलेवाडी, कौलगे, कुमरी, कुंबळहाळ, काळामवाडी, महागाव, मुगळी, नेसरी, सांबरे, सरोळी, शिप्पर नेसरी, तारेवाडी, येणचवंडी, यमेहट्टी, तावरेवाडी व वैरागवाडी.

आजरा - ३७ ग्रामपंचायती - ३०९
लाटगाव, बहिरेवाडी, मडिलगे, दाभिल, खेडे, खानापूर, आजरा, चितळे, शेळप, हाजगोळी बुद्रुक, पारपोळी, उत्तूर, साळगाव, मासेवाडी, सरंबळेवाडी, कानोळी, सुळेरान, होन्याळी, किटवडे, भादवणवाडी, धामणे, पेंढारवाडी, पोळगाव, भादवण, वझरे, वडकशिवाले, गजरगाव, लाकूडवाडी, आर्दाळ,   सोहाळे, श्रुंगारवाडी, झुलपेवाडी, कोरीवडे, आवंडी, कोळींद्रे, हाजगोळी खुर्द 
व चाफवडे.

पन्हाळा - ५० पंचायती - ४२६
आकुर्डे, आळवे, आंबवडे, आसगाव, आसुर्ले, बहिरेवाडी, बांदिवडे, बोंगेवाडी, कसबा बोरगाव, चव्हाणवाडी, घरपण, दरेवाडी, घोटवडे, गिरोली, गोलीवडे, गोठे, जाखले, काखे, करंजफेण,किसरूळ, कोलीक, कोतोली, कोलोली, कुंभारवाडी, कुशिरे ठाणे, माले, मल्हापेठे, माळवाडी को, मानवाड, मरळी, मिठारवाडी, मोरेवाडी, पडळ, पणोरे, पणुत्रे, परखंदळे, पाटपन्हाळा, पिंपळे सातवे, पिंपळे ठाणे, पोहोळे आळते, पोर्ले बोरगाव, राक्षी, साळवाडी, सावर्डे असंडोली, शहापूर, तांदुळवाडी, वाळोली, वाघुर्डे. 

शाहूवाडी - ४९ पंचायती - ४०३
अमेणी, आरूळ, आंबार्डे, बजागेवाडी, बांबवडे, बहिरेवाडी, भाडळे, भेडसगाव, चरण, डोणोली, गोगवे, घुंगूर, हारूगडेवाडी, करंजोशी, कडवे, करंजफेण, करूंगळे, वारणाकापशी, कातळेवाडी, कोपार्डे, कोळगाव, कोतोली, 
खुटाळवाडी, खेडे, लोळाणे, मरळे, माणगाव, माळापुडे, निळे, परखंदळे, पिशवी, रेठरे, सरूड, साळशी, सांबू, शिराळे तर्फ वारुण, शिवारे, चनवाड/शाहूवाडी, टेकोली, तुरुकवाडी, उचत, उदगिरी, उखळू, विरळे, वरेवाडी, येळाणे, येलूर, येळवणजुगाई.

Web Title: kolhapur news politics in grampanchyat election