शेट्टींच्या पेजवरून सदाभाऊंवर ॲटॅक

सुनील पाटील
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - लढायला जाणारा जवान कधी घरावर तुळशीपत्र ठेवून लढायला निघालो म्हणत नाही, तर तो जवान मी माझ्या देशासाठी आणि आईची सेवा करण्यासाठी बलिदान देऊन शहीद होण्यासाठी आलो असल्याचेच सांगत असतो, असे आव्हान देत घरावर तुळशीपत्र ठेवून शेतकऱ्यांसाठी काम करत असल्याचे सांगत फिरणाऱ्या मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर खासदार राजू शेट्टी यांच्या सोशल मीडिया पेजवरूनही ‘ॲटॅक’ सुरू आहे.

देशासाठी लढणारा जवान कधीही मी घरावर तुळशीपत्र ठेवून लढाईला आलो आहे, असे सांगत नाही; तर ती लढाई म्हणजे देशाची आणि आपल्या आईची सेवा समजतो; मात्र काही जण ‘सदा’ (सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता) घरावर तुळशीपत्र ठेवून शेतकऱ्यांसाठी काम केल्याचे सांगत फिरत आहेत. एखादे यश साध्य करायचे असेल तर जीव गमवावा लागतो, हे आपल्या जवानांनी शिकवले आहे. देशासाठी बलिदान देण्यासाठी जाणारे जवान कधीही याचा गाजावाजा करत नाहीत. अशाच जवानांसारखे काम शेतकऱ्यांसाठी करत शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून देशभरात आपली ओळख निर्माण करावी लागते. खासदार शेट्टी ३० वर्षापासून या चळवळीत काम करत असताना त्यांनी कशाचीच तमा बाळगली नाही. ‘जो जगाची गुरे राखतो त्याची गुरे देव राखत असतो’ या समजूतीप्रमाणे शेट्टी यांनी काम केले आहे.  

खासदार राजू शेटटी जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांच्यावर साखर कारखान्याच्या गुंडाकडून प्राणघातक हल्ला झाला. पण बळीराजाच्या कृपेने वाचले व पुढे त्यांनी आपल साडेपाच फुटाचं शरीर शेतकऱ्यांना समर्पित करून तमाम देशातील शेतकऱ्यांचे मसिहा झाले. या तीस वर्षात त्यांनी दुर्बिणेने शोधूनसुध्दा सापडणार नाही असा कोणताच डाग आपल्यावर लावून घेतला नाही. यामुळेच  ते आजही ‘वास्को द गामा’ यांच्यासारखे अन्याय होत असेल तर प्रवाहाच्या विरोधात जाण्यास डगमगत नाहीत, असे आव्हानही या पेजवरून केले आहे. आता सदाभाऊ या पेजला कोणत्या प्रकार उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, याच सोशल मिडिया पेजवर खासदार राजू शेट्टी यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यांना जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतल्यानंतर फोटोही झळकला आहे.

Web Title: kolhapur news politics with raju shetty & sadabhau khot