इचलकरंजी येथे यंत्रमाग उद्योजकांची आत्महत्या

राजेंद्र होळकर
सोमवार, 26 मार्च 2018

इचलकरंजी -  येथील कोल्हापूर रोडवरील साईमंदीर शेजारी राहणाऱ्या एका यंत्रमाग उद्योजकाने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. प्रकाश धनवडे असे आत्महत्या केलेला यंत्रमाग कारखानदाराचे नाव आहे. त्याने रात्री गळपास घेऊन आत्महत्या केली.

येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी आले आहेत. घटनास्थळाचा पंचनामा करुन, मृतदेह येथील आयजीएम रुग्णालयामध्ये मरणोत्तर तपासणीसाठी पाठविला आला आहे.  उद्योजक धनवडे गेल्या काही दिवसांपासून कर्ज झाल्याने त्रस्त होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Kolhapur News power loom businessman suicide in Ichalkaraji