इचलकरंजीत यंत्रमागधारकांचा उद्या मेळावा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

इचलकरंजी - यंत्रमाग कामगारांना प्रशासनाने जाहीर केलेल्या मजुरीवाढीबाबत सविस्तर भूमिका जाहीर करण्यासाठी उद्या (गुरुवार) दुपारी चार वाजता पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहात यंत्रमागधारकांचा मेळावा आयोजित केला आहे.

इचलकरंजी - यंत्रमाग कामगारांना प्रशासनाने जाहीर केलेल्या मजुरीवाढीबाबत सविस्तर भूमिका जाहीर करण्यासाठी उद्या (गुरुवार) दुपारी चार वाजता पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहात यंत्रमागधारकांचा मेळावा आयोजित केला आहे. 

अप्पर कामगार आयुक्तांनी यंत्रमाग कामगारांना सहा पैसे मुजरीवाढ केली आहे. त्या विरोधात यंत्रमागधारकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तीन वर्षांपासून यंत्रमाग उद्योगात प्रचंड अस्थिरता आली आहे. मंदीमुळे उद्योग बंद पडण्याच्या स्थितीत आहे. उत्पादन खर्च वाढल्याने कापड दरावर परिणाम होत आहे. त्यामुळे कापडाची मागणी घटली आहे. आता सहा पैसे मजुरीवाढ जाहीर केली आहे. ही मजुरीवाढ पेलण्याची क्षमता यंत्रमागधारकांत नसल्याचे मत यंत्रमागधारक संघटनांचे आहे. 

या पार्श्‍वभूमीवर मजुरीवाढीच्या विरोधात यंत्रमागधारकांची सविस्तर भूमिका जाहीर करण्यासाठी उद्या (ता. 25) दुपारी 4 वाजता पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहात व्यापक मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात मजुरीवाढीबाबत पुढील निर्णय जाहीर केला जाईल. यावेळी यंत्रमागधारकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सतीश कोष्टी (पॉवरलूम असोसिएशन), दीपक राशिनकर (कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशन), विनय महाजन (यंत्रमागधारक जागृती संघटना), सचिन हुक्कीरे (पॉपलिन यंत्रमागधारक संघटना), तसेच विश्‍वनाथ मेटे (साधे यंत्रमाग संरक्षण समिती) यांनी केले आहे. 
 

Web Title: Kolhapur News Power loom owner conference in Ichalkaranji