अब्दूललाट परिसरातील यंत्रमाग कामगारांचा मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

इचलकरंजी - मजुरीवाढ फरकासह मिळावी, या मागणीसाठी अब्दुललाट (ता. शिरोळ) परिसरातील यंत्रमाग कामगारांनी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. सरकारी कामगार अधिकारी महानोर यांना निवेदन दिले. याबाबत शुक्रवारी (ता. 16) यंत्रमागधारकांच्या उपस्थीतीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

सहाय्यक कामगार आयुक्तांनी मजुरीवाढ जाहीर केली आहे. पण अब्दुललाट परिसरातील यंत्रमागधारकांनी मजुरीवाढ दिलेली नाही. त्यामुळे यंत्रमाग कामगारांनी शनिवारपासून काम बंद आंदोलन केले आहे. आज लाल बावटा जनरल कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला.

मजुरीवाढ फरकासह द्यावी, अशी मागणी करीत यंत्रमाग कामगारांनी जोरदार निदर्शने केली. त्यानंतर सरकारी कामगार अधिकारी महानोर यांनी संबंधित यंत्रमागधारकांना पत्र देवून शुक्रवारी (ता. 16) सकाळी साडे अकरा वाजता बैठकीस बोलविले आहे. आंदोलनाचे नेतृत्व दत्ता माने यांनी केले. आंदोलनात शिवगोंडा खोत, सुभाष कांबळे, रामचंद्र पोला आदींनी केले. 

Web Title: Kolhapur News Power loom worker agitation