यंत्रमाग कामगारांचा उद्या प्रांत कार्यालयावर मोर्चा

पंडित कोंडेकर
बुधवार, 3 जानेवारी 2018

इचलकरंजी - मजुरीवाढीच्या मागणीसाठी उद्या (गुरुवारी) सकाळी 10 वाजता थोरात चौक येथून प्रांत कार्यालयावर यंत्रमाग कामगारांचा मोर्चा निघणार आहे. तर सांयकाळी पाच वाजता लिंबू चौक येथे कामगारांची जाहीर सभा होणार आहे. याबाबतची घोषणा आज थोरात चौकात झालेल्या यंत्रमाग कामगारांच्या जाहीर सभेत करण्यात आली.

इचलकरंजी - मजुरीवाढीच्या मागणीसाठी उद्या (गुरुवारी) सकाळी 10 वाजता थोरात चौक येथून प्रांत कार्यालयावर यंत्रमाग कामगारांचा मोर्चा निघणार आहे. तर सांयकाळी पाच वाजता लिंबू चौक येथे कामगारांची जाहीर सभा होणार आहे. याबाबतची घोषणा आज थोरात चौकात झालेल्या यंत्रमाग कामगारांच्या जाहीर सभेत करण्यात आली.

सभेमध्ये कामगार नेते मिश्रीलाल जाजू व दत्ता माने यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. काम बंद आंदोलनाचा आज तिसरा दिवस असतांनाही मागण्यांबाबत प्रशासनाच्या पातळीवर कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे सभेमध्ये जाजू व माने यांनी जोरदार टिका केला. कोणत्याही परिस्थीतीत मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे पून्हा एकदा त्यांनी यावेळी निर्धार व्यक्त केला.

संपूर्ण वस्त्रोद्योग ठप्प

यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढ प्रश्‍नी काम बंद आंदोलनामुळे अनेक यंत्रमाग कारखाने बंद आहेत. त्यामुळे कापड उत्पादन ठप्प झाले आहे. दुसरीकडे आज दलीत संघटनांच्या "महाराष्ट्र बंद"मुळे शहरातील संपूर्ण यंत्रमाग उद्योग व या उद्योगाशी निगडीत सर्व व्यवहार बंद राहिले. 

आज सकाळी थोरात चौकात सभा झाली. अध्यक्षस्थानी शामराव कुलकर्णी होते. सभेत कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे आनंदा गुरव, मदन मुरगुडे, राजेंद्र निकम, परशराम आगम, मारुती आजगेकर, धोंडीबा कुंभार, शिवानंद पाटील, सदा मलाबादे, पार्वती जाधव, बंडोपंत सातपूते यांची भाषणे झाली. 

आंदोलनाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या (गुरुवारी) सकाळी दहा वाजता थोरात चौकातून मोर्चा काढण्यात येणार आहे. महात्मा गांधी पुतळा मार्गे हा मोर्चा प्रांत कार्यालयावर जाणार आहे. या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी कामगार नेत्यांनी केली. सांयकाळी पाच वाजता तांबे माळ येथे यंत्रमाग कामगारांची जाहीर सभा घेण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहीर केले.

Web Title: Kolhapur News power loom workers agitation for salary hike