हिंसक आंदोलनातून न्याय मिळत नाही - प्रवीण गायकवाड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

कोल्हापूर - ‘‘हिंसक मार्गाने केलेल्या आंदोलनातून न्याय मिळतो, ही बाब डोक्‍यातून काढून टाका. लोकशाही मार्गाने कायदा व बुद्धीचा वापर करून केलेल्या हिंमतवान आंदोलनातून न्याय मिळू शकतो. त्याच चौकटीत भविष्यात संभाजी ब्रिगेड आंदोलन उभे करेल,’’ असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर - ‘‘हिंसक मार्गाने केलेल्या आंदोलनातून न्याय मिळतो, ही बाब डोक्‍यातून काढून टाका. लोकशाही मार्गाने कायदा व बुद्धीचा वापर करून केलेल्या हिंमतवान आंदोलनातून न्याय मिळू शकतो. त्याच चौकटीत भविष्यात संभाजी ब्रिगेड आंदोलन उभे करेल,’’ असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले.

संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ यांच्यातर्फे झालेल्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. संभाजी ब्रिगेडला तीन वर्षांत आलेली मरगळ झटकून सामाजिक अंगाने आंदोलन नव्याने उभी करण्यासाठी संभाजी ब्रिगेड कार्य करणार आहे, अशी भूमिका घेऊन हा मेळावा झाला.

श्री. गायकवाड म्हणाले, ‘‘माझ्यावर संघटना फोडल्याचा आरोप झाला, पैसे घेतल्याचे सांगण्यात आले. त्यात तथ्य नाही. पुण्यात जेम्स लेनविरोधी आंदोलन केले. रायगडावरील वाघ्या कुत्रा या विषयावर आंदोलन केले.

शिवनेरी गडावर धार्मिक, सांस्कृतिक विषय घेऊन गैरसमज पसरविणाऱ्यांविरोधात आंदोलन केले. यात कार्यकर्त्यांना अटक झाली. त्याची विचारपूस कोणी केली नाही. त्या कार्यकर्त्यांना सोडवून आणण्याचे काम मी केले. हिंसक आंदोलन यशस्वी होत नाही. अभ्यास करून लोकशाही मार्गाने केलेली सामाजिक आंदोलने यशस्वी करण्याचे काम या पुढील काळात संभाजी 
ब्रिगेड करेल.’’

हिंदूराव हुजरे-पाटील म्हणाले, ‘‘संभाजी ब्रिगेडचे कोल्हापुरात काम आम्ही सुरू केले. ते प्रामाणिकपणे व पदरमोड करून केले. अनेक आंदोलने उभी केली, पण कधी तडजोड केली नाही. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले तरीही संघटनेशी निष्ठा सोडलेली नाही. पुढील काळात सामाजिक अंगाने आम्ही काम करणार आहोत.’’

सोमेश्‍वर आहिरे म्हणाले, ‘‘संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष असल्याची चर्चा सुरू झाल्याने आम्ही अस्वस्थ झालो. आम्हाला कोणालाही विश्‍वासात न घेता ब्रिगेडला राजकीय पक्ष भासविण्याचे प्रयत्न झाले म्हणून या पुढील काळातील संभाजी ब्रिगेडचे काम हे सामाजिक अंगाने व्हावे यासाठी प्रयत्नशील राहू.’’

या वेळी सुधीर भोसले, राजू सावंत, बाळासाहेब पाटील, सुनीता पाटील, संजय साळुंखे, मानसिंग देसाई आदी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Pravin Gayakwad comment