उचगाव-उजळाईवाडी मार्गावर अपघातांना ब्रेक

उचगाव-उजळाईवाडी मार्गावर अपघातांना ब्रेक

कोल्हापूर - उजळाईवाडी ते तावडे हॉटेल चौक तीन किलो मीटरचा टप्पा. या टप्प्यात जानेवारी ते मे अखेर ११ जणांचा अपघाती मृत्यू झाला. हा टप्पाच वाहतुकीसाठी जीवघेणा ठरला. अपघातावर नियंत्रणासाठी गांधीनगर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी कौशल्य पणाला लावले. रम्बलर्ससह स्पीडब्रेकरच्या पट्ट्यांचे तंत्र प्रभावीपणे वापरले. त्याच जोडीला हेल्मेट प्रबोधन काटेकोर राबवले.

तीन महिन्यांत याच टप्प्यातील अपघाताचे प्रमाण शुन्यावर आणले. पोलिस केवळ खेकसाखेकसी आणि दंडूकशाही एवढेच करतात, असे नव्हे तर अभियांत्रिकी दर्जाच्या तांत्रिक विषयाचा अभ्यास करून कर्तव्यही सिद्ध करतात. त्याचेच फलित म्हणून अपघात कमी होऊन, अनेकांचा जीव वाचविण्यात झाले. पुणे-बंगळुरू हायवेवरील उजळाईवाडी ते तावडे हॉटेल चौक हा रस्ता पूर्ण उतरता आणि सरळ मार्गी आहे.

सरनोबतवाडी, उचगाव, गडमुडशिंगी, पसरीचानगर, राजाराम तलाव मार्गाहून येणारे सर्व्हिस रोड हायवेवर येतात. हायवेवर मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरू असते. उतार आणि सरळमार्गामुळे वाहनांची गतीही अधिक असते. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले. अपघातात मरण पावलेल्यांची संख्याही वाढली.कोल्हापूर पोलिस दलाने ‘सुरक्षित वाहतूक’ हा उपक्रम राबविण्यास सुरवात केली. त्या अनुषंगाने ट्रॅफिक ड्राईव्ह, हेल्मेटबाबतचे प्रबोधन उपक्रम राबविला. 

गांधीनगर ठाण्याची धुरा सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी हाती घेतली. उजळाईवाडी ते तावडे हॉटेल रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण पाहून, त्यावर काहीतरी उपाय योजना करण्याचे त्यांनी ठरवले. या मार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या, त्यांची गती, अपघातांची संख्या, हायवेला जोडणारे सर्व्हिस रोड याचा अभ्यास केला. इंटरनेटवरील नकाशा आणि तज्ज्ञांची मते घेतली.

या रस्त्यावरील वाहनांची गती कमी करण्यासाठी स्पीडब्रेकर पट्ट्या आणि रम्बलर्स बसविण्याच्या निष्कर्षापर्यंत ते पोचले. त्यांनी ‘एमएसआरडीसी’शी (महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ) संपर्क केला. पुणे येथील ‘एमएसआरडीसी’च्या कार्यालयात जाऊन येथील रवींद्र साळोखे यांच्याकडे पाठपुरावा करत, चार स्पीड ब्रेकरपट्ट्या व चार रम्बरर्ल्सला मंजुरी मिळवली. जागा निश्‍चित करून ते जूनच्या सुरवातीला ते बसवले. वाहतूक पोलिस नेमून हेल्मेट व वाहतूक नियमांचे प्रबोधन सुरू केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com