अपर उपायुक्त संजीवकुमार पाटील, हवालदार घाणेकरांना राष्ट्रपती पदक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

कोल्हापूर - पोलिस दलात उल्लेखनीय काम केल्याबद्दल राज्य गुप्तवार्ता विभागाचे अपर उपायुक्त संजीवकुमार पाटील आणि बिंदू चौक सबजेलचे पोलिस हवालदार संजीव घाणेकर यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले. 

कोल्हापूर - पोलिस दलात उल्लेखनीय काम केल्याबद्दल राज्य गुप्तवार्ता विभागाचे अपर उपायुक्त संजीवकुमार पाटील आणि बिंदू चौक सबजेलचे पोलिस हवालदार संजीव घाणेकर यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले. 

पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रजासत्ताकदिनी गौरव केला जातो. कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी गुप्तवार्ता विभागात अपर उपायुक्त म्हणून सेवा बजावणारे संजीवकुमार विश्‍वास पाटील आणि बिंदू चौक सबजेलमध्ये पोलिस हवालदार म्हणून सेवा बजावणारे संजीव सखाराम घाणेकर यांना राष्ट्रपदी पोलिस पदक जाहीर झाले. 

संजीवकुमार पाटील हे १९८५ मध्ये पोलिस दलात उपनिरीक्षकपदी रुजू झाले. त्यांनी मुंबईत सहा वर्षे काम पाहिले. त्यानंतर गेली २९ वर्षे ते विशेष शाखेत कर्तव्य बजावत आहेत. २००३ पासून ते कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांचे अप्पर उपायुक्त म्हणून ते काम पाहत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हे पदक जाहीर झाले. 

संजीव घाणेकर हे मूळचे पोपळी चिपळूण (ता. रत्नागिरी) येथील रहिवासी आहेत. ते १९९२ मध्ये पोलिस दलात भरती झाले. सातारा, येरवडा, कळंबा मध्यवर्ती येथे त्यांनी कर्तव्य बजावले. २०१५ मध्ये त्यांना पोलिस हवालदारपदी बढती मिळाली. सध्या ते बिंदू चौक कारागृहात कर्तव्य बजावत आहेत. बंदीजनांमध्ये चांगले व सकारात्मक बदल घडविण्यासाठी कारागृहात विविध उपक्रम राबवले जातात. तेथे त्यांनी उल्लेखनीय भूमिका बजावली आहे.

Web Title: Kolhapur News President Medal to Sanjeev Kumar, Ghanekar