फडणवीस सरकार फसवे : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

सनातनवर बंदीचा प्रस्ताव केंद्राकडे : चव्हाण 
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सनातन संस्थेच्या कारवाया धोकादायक असल्याने या संघटनेवर बंदी घालण्याचा पोलिसांचा प्रस्ताव मी मुख्यमंत्री असताना माझ्याकडे आला होता. त्यावर तातडीने निर्णय घेत मी हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. सतत केंद्राशी पत्रव्यवहार केला,त्यांना हवी ती माहीतीही दिली.

कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुर्नर्विकास योजनेतील भ्रष्टाचाराच्या आरोपातून आपली सुटका करुन घेण्यासाठी न्यायालयीन चौकशी ऐवजी लोकायुक्त नेमला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे भ्रष्टाचारी आहे. कर्जमाफीसह त्यांच्या सर्व योजना फसव्या आहेत. त्यामुळे कर्जमाफीच्या घोषणनंतरही 400 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

राजीव गांधी जयंत्तीनिमित्त आयोजित केलेल्या सदभावना दौडसाठी ते कोल्हापूरात आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केले. भ्रष्टाचारामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नैराश्‍य आले असून त्यांनी या नैराश्‍येपोटी विरोधी पक्ष आणि माध्यमे यांच्यावर खालच्या पातळीवर जाउन टीका करायला सुरवात केली आहे, हे निषेर्धाह असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगीतले. 

फसव्या कर्जमाफीने शेतकरी आत्महत्येत वाढच : चव्हाण 
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देवेंद्र फडणवीस सरकारला कर्जमाफी द्यायचीच नव्हती.पण कॉग्रेससह सर्व विरोधी पक्ष इतिहासात पहिल्यांदाच एकत्र आले आणि त्यानीं संघर्ष यात्रा काढून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची मागणी केली.त्यामुळे त्यांना याचा विचार करावा लागला. उत्तरप्रदेश निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी मते मिळविण्यासाठी कर्जमाफी देण्याची घोषणा केली.त्यामुळे महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस सरकारलाही ते टाळता आले नाही. जे सरकार 30 हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठ द्यायला तयार नव्हते.त्या सरकारने 34 हजार कोटी रुपये आणले कोठून असा प्रश्‍न आहे.पण जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे आमचे समाधान झालेले नाही.निकष असायला हवेत.ते आमच्या सरकारनेही ठेवले होते. पण दीड लाखापर्यंतची कर्जमाफी ही फसवी आहे.यातून शेतकऱ्यांचे भले होणार नाही. ऑनलाईन पध्दती सपशेल फेल आहे.शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही. त्यामुळे सरकारची कर्जमाफी योजना फसवी आहे. त्यामुळे कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या करत आहेत. 

भ्रष्टाचारी फडणवीस सरकार 
मुंबईतील झोपडपट्टीवासियांच्या पुर्नर्विकासाची योजना(झोपू) देशातल्या सर्वात मोठ्या बिल्डराच्या सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या फायद्यासाठी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी बेकायदेशीर निर्णय घेतल्याचे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले हे प्रकरण उघडकीस येताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने बैठक घेतली आणि चौकशीसाठी लोकायुक्त नेमला.पण मुख्यमंत्र्यांनी स्वताची सोडवणूक करण्यासाठी लोकायुक्त नेमला. माजी मंत्री एकनाथ खडसे यांची जशी न्यायालयीन चौकशी झाली,तशी चौकशी व्हायला पाहीजे होती. पण फडणवीस यांनी चाणाक्षपणे ते टाळले आणि या भ्रष्टाचाराला आपलाही पाठींबा आहे, हे एकप्रकारे दाखवून दिले. या बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी फडणवीस,मेहता यांच्यावर वरुनही दबाव आल्याचा आपल्याला संशय आहे. याच सरकारमधील उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही चुकीचे निर्णय घेतले. सुमारे 50 हजार कोटी रुपयांच्या एमआयडीसीच्या जमिनी डी नोटीफिकेशनच्या माध्यमातून चुकीच्या पध्दतीने दिल्या आहेत. हे देखील प्रकरण अधिवेशनात महत्वाचे होते.दोन्ही चौकश्‍या करायला आम्ह बाग पाडले. 

प्रकाश मेहतांना वेगळा न्याय का? 
भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरुन माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राजीनामा घेण्यात आला.त्यांना सरकारमधून बाजूला करण्यात आले.पण याच सरकारमधल्या प्रकाश मेहता या गृहनिर्माण मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होउनही त्यांचा राजीनामा घ्यायला फडणवीस का तयार नाहीत. मेहता यांना त्यांचा पाठींबा का आहे. खडसेंना वेगळा न्याय व मेहतांना वेगळा न्याय असे का घडले आहे,असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला. 

शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्यांना पाठींबा 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन्ही नेत्यांनी भाजपला पाठींबा दिला. त्यापैकी एकाला मंत्रीपद मिळाले,दुसऱ्याला नाही. त्यामुळे दुसरा नाराज आहे. जो शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने लढा देईल. त्याला आमचा पाठींबाच असेल,असेही चव्हाण यांनी पत्रकारांना सांगीतले. 

सनातनवर बंदीचा प्रस्ताव केंद्राकडे : चव्हाण 
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सनातन संस्थेच्या कारवाया धोकादायक असल्याने या संघटनेवर बंदी घालण्याचा पोलिसांचा प्रस्ताव मी मुख्यमंत्री असताना माझ्याकडे आला होता. त्यावर तातडीने निर्णय घेत मी हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. सतत केंद्राशी पत्रव्यवहार केला, त्यांना हवी ती माहीतीही दिली. दरम्यानच्या काळात आमचे सरकार पडले. सनातन संस्थेच्या कारवायांचे दाभोळकर,पानसरे,कुलबर्गी हे बळी ठरले. पण त्यावेळी सनातनवर बंदी घालण्याचा राज्यसरकारचा प्रस्ताव आजही केंद्राकड प्रलंबीत आहे. त्यांचा त्याबद्दलचा दुष्टीकोन काय आहे,हे पाहण्याची गरज आहे. विद्यमान सरकारने मारेकरी पकडण्यासाठी मी जाहीर केलेल्या बक्षीस रक्कमेतही कपात केल्याची माहीती मला मिळाली आहे. आरोपींची नावे पुढे आली आहेत.पण त्यांना अजूनही अटक होत नाही,हे दुदैवी असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: Kolhapur news Prithviraj Chavan criticize Devendra Fadnavis government