खासगी सावकाराची कंत्राटदाराला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी कंत्राटदाराला बेदम मारहाण करून त्याची आलिशान मोटार जबरदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

याबाबतची फिर्याद विजय तानाजी जरग (वय ३७, रा. दारवाड, ता. भुदरगड, सध्या बापट कॅम्प) यांनी दिली. या प्रकरणी चेतन नवीनभाई पटेल (वय ४७, रा. ताराबाई पार्क), प्रवीण शामराव पुजारी (३७, रा. कावळा नाका), किशोर दुंडाप्पा माने (२५) आणि विजय विठ्ठल कांबळे (४०, रा. सदर बाजार) यांना रात्री उशिरा अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती - विजय जरग महावितरणकडील कंत्राटे घेतात. चार ते पाच महिन्यांपूर्वी त्यांना पैशाची गरज होती. त्यांनी ओळखीच्या चेतन पटेल याच्याकडून पाच लाख रुपये दरमहा सात टक्के व्याजाने घेतले. त्या पोटी जरग यांनी दीड लाख, ५० हजार आणि ३० हजार असे दोन लाख रुपये पटेल याला दिले. मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पटेल यांनी उरलेली रक्कम व त्याच्या व्याजासाठी तगादा लावला होता. तो रात्री-अपरात्री जरग यांच्या घरी गुंडांना घेऊन शिवीगाळ व धमकी देत होता. त्याने त्यांना कावळा नाका येथे बोलवून घेतले. त्यांच्याकडून कोऱ्या धनादेशावर स्वाक्षऱ्या करून घेतल्या.

यानंतर ३ ऑगस्ट २०१७ ला पटेलने त्यांना शिवाजी विद्यापीठ चौकात सायंकाळी बोलवून घेतले. जरग तेथे पत्नीच्या मालकीच्या आलिशान मोटारीतून गेले. तेथे पटेल व त्याचे साथीदार प्रवीण पुजारी, किशोर माने, विजय कांबळेही होते. पटेलने कर्जाऊ दिलेल्या पैशाची मागणी केली. तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर त्या सर्वांनी त्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली आणि त्यांची मोटार जबरदस्तीने काढून घेतली. याबाबत जरग यांनी पटेलशी संपर्क साधून मोटारीबाबत विचारणा केली. त्या वेळी त्याने प्रवीण, किशोर आणि विजय या तिघांनी शाहूपुरीतील योगेश राणे याच्याकडे गहाणवट ठेवून पैसे घेतल्याचे सांगितले. राणेकडून तिघांनी ही मोटार तीन ते साडेतीन लाख रुपयांना गहाणवट ठेवल्याचे जरग यांना समजले. त्यांनी याबाबत राजारामपुरी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार चेतन, प्रवीण, किशोर आणि विजय यांच्यावर खासगी सावकारकी, जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला.

Web Title: kolhapur news Private lender beat the contractor