‘सुटा’ अध्यक्षपदी प्रा. आर. एच. पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) मध्यवर्ती द्विवार्षिक निवडणुकीत डॉ. आर. एच. पाटील (के. आर. पी. कन्या महाविद्यालय, इस्लामपूर) यांची अध्यक्ष, तर प्रा. डी. एन. पाटील (दूधसाखर महाविद्यालय) यांची प्रमुख कार्यवाहपदी बिनविरोध निवड झाली.

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) मध्यवर्ती द्विवार्षिक निवडणुकीत डॉ. आर. एच. पाटील (के. आर. पी. कन्या महाविद्यालय, इस्लामपूर) यांची अध्यक्ष, तर प्रा. डी. एन. पाटील (दूधसाखर महाविद्यालय) यांची प्रमुख कार्यवाहपदी बिनविरोध निवड झाली.

कार्यालय कार्यवाह म्हणून प्रा. यू. ए. वाघमारे (आय. सी. महाविद्यालय, इस्लामपूर) खजिनदार म्हणून प्रा. श्रीमती इला जोगी (महिला महाविद्यालय, कराड) यांचीही बिनविरोध निवड झाली. कऱ्हाड येथे ‘सुटा’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बिनविरोध निवडीची घोषणा झाली.

‘सुटा’ मध्यवर्तीसाठी १५ सदस्यांची व ६ महिला सदस्यांची कार्यकारिणीवर निवड केली. कोल्हापूर जिल्ह्यातून प्रा. एस. वाय. पाटील (भोगावती), प्रा. बी. आय. आवटे (कोपार्डे), प्रा. गजानन चहाण (जयसिंगपूर) व प्रा. जी. एच. आळतेकर (सरूड), सांगली जिल्ह्यातून प्रा. जे. ए. यादव (तासगाव), प्रा. डॉ. रमेश पाटील (इस्लामपूर), प्रा. एस. एस. साठे (मिरज) व प्रा. पी. ई. जाधव (आटपाडी), सातारा जिल्ह्यातून प्रा. भोसले (कोरेगाव), प्रा. डॉ. एच. व्ही. जाधव (वाई), प्रा. एस. एम. मोहोळकर व प्रा. एन. व्ही गायकवाड (रेठरे), सोलापूर जिल्ह्यातून प्रा. डॉ. भारत जाधव (मोहोळ), प्रा. संजय देवकर (बैराग) व प्रा. जे. फुलारी (सांगोला) कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडून आले आहेत. महिला सदस्यांमध्ये प्रा. डॉ. उषा पाटील (कोल्हापूर), प्रा. सुनीता अमृतसागर (पेठवडगाव), प्रा. संगीता पाटील (कडेपूर), प्रा. एम. एन. कुलकर्णी (मिरज), प्रा. डॉ. शरयू भोसले (रहिमतपूर) व प्रा. डॉ. मनीषा पाटील (सातारा) यांची कार्यकारिणीवर बिनविरोध निवड झाली आहे.

निवडणूक अधिकारी म्हणून प्रा. डॉ. शिवकुमार सोनाळकर, संजय पाटील व बी. डी. पाटील यांनी मदतनीस म्हणून काम पाहिले.

Web Title: Kolhapur News Prof R H Patil selected as SUTA President