आमचं कुणाशी जुळलं नाही... मोडलंही नाही - प्रा. मंडलिक

रमेश पाटील
बुधवार, 3 जानेवारी 2018

म्हाकवे - "दिवगंत मंडलिकांशी ऋणानुबंध असलेल्या व्यक्तींना बोलावून पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. 
हा कोणताही पक्षीय कार्यक्रम नसून, मंडलिकांच्या विचारांचा जागर आहे. हा कार्यक्रम म्हणजे कुणी राजकीय भूमिका बदलली असे होत नाही. आमचं कुणाशी जुळलं नाही आणि मोडलंही नाही,' असा खुलासा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी केले. 

म्हाकवे - "दिवगंत मंडलिकांशी ऋणानुबंध असलेल्या व्यक्तींना बोलावून पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. 
हा कोणताही पक्षीय कार्यक्रम नसून, मंडलिकांच्या विचारांचा जागर आहे. हा कार्यक्रम म्हणजे कुणी राजकीय भूमिका बदलली असे होत नाही. आमचं कुणाशी जुळलं नाही आणि मोडलंही नाही,' असा खुलासा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी केले. 

दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्या नावाने दरवर्षी देण्यात येणाऱ्या स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी हमिदवाडा (ता. कागल) येथील एसडीएम फाउंडेशनवर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले अध्यक्षस्थानी होते. या वेळी वीरेंद्र मंडलिक, आर. डी. पाटील, शेखर सावंत, विश्वास कुऱ्हाडे, विजय भोसले, कृष्णात गोते, शिवाजीराव इंगळे, आनंदा मोरे, नंदू पाटील आदी उपस्थित होते. 

"आम्ही आमच्या मार्गाने राजकीय वाटचाल करत अहोत. त्यामुळे कुणीही बोललेल्या राजकीय गोष्टीचा खुलासा करणे आवश्‍यक नाही,' असे स्पष्ट करून प्रा. मंडलिक म्हणाले, ""आता कोणती निवडणूक आहे, म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रित केलेले नाही, तर शरद पवार आणि दिवगंत मंडलिकांचे 1967 पासून जिव्हाळ्याचे संबंध होते. कॉंग्रेस पक्ष बळकट करणे, राष्ट्रवादी स्थापनेवेळी, तसेच अन्य राजकीय घडामोडींत पवारांना (स्व.) मंडलिकांनी मोलाची साथ दिली.

हमिदवाडा कारखान्याची उभारणी असो, जिल्हा परिषदेतील अविश्वास ठराव अथवा त्यांना मिळालेले मंत्रिपद असो, पवारांनी मंडलिकांनाच साथ दिली. दिवगंत शंकरराव चव्हाण यांच्याशीही मंडलिकांचे स्नेहाचे संबंध होते. त्यामुळे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पतंगराव कदम यांच्याशी मंडिलकांचे मित्रत्वाचे संबंध होते. त्यामुळे त्यांना निमंत्रित केले आहे;त्तिर मी स्वत: शिवसेनेत असल्याने शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निमंत्रित केले आहे. त्यामुळे या कार्यक्रमास पक्षीय संदर्भ नाही.'' 

जीवन साळोखे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी वीरेंद्र मंडलिक, मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, एस. आर. बाईत, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. नंदकुमार घोरपडे, राजू पाटील, बाजीराव गोधडे, भगवान पाटील, आप्पासाहेब पाटील आदी उपस्थित होते. प्रा. एन. एस. पाटील यांनी आभार मानले. 

साखरेचे दर स्थिर ठेवावेत 
गळीत हंगामाच्या सुरवातीला साखरेचे दर जादा असताना एफआरपी व दोनशे रुपये जादा देण्याचे कारखानदारांनी मान्य केले; परंतु महिनाभरातच साखरेचे दर 2900 रुपयांपर्यंत घसरले. आगामी काळात ते दर 2600 रुपयांपर्यंत घसरण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अशा बिकट परिस्थितीत ठरलेला ऊसदर शेतकऱ्यांना देणे कारखानदारीला आर्थिक संकटात टाकणारे आहे. यामुळे सक्षम असणारे कारखानेही आजारी पडतील; त्यामुळे शासनाने साखरेचे दर स्थिर ठेवावेत. यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्या मध्यस्थीने केंद्र शासनाला साकडे घालणार असल्याचे प्रा. मंडलिक यांनी सांगितले. 

Web Title: Kolhapur News Prof Sanay Mandalik Comment