व्यावसायिक कचऱ्याचे ‘एकटी’कडे संकलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

महापालिकेचा निर्णय - शहरात टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी
कोल्हापूर - महापालिकेने शहरांतर्गत दैनंदिन निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी सर्व भाजी बाजार, हॉटेल्स, खानावळी, तसेच जनरल मटण मार्केटसह इतर मटण-चिकन विक्री दुकानदारांकडे निर्माण होणारा कचरा स्वतंत्ररीत्या ओला व सुका असा वर्गीकरण करण्यासाठी ‘एकटी’ या सामाजिक व सेवाभावी संस्थेची नेमणूक केली आहे. संबंधित संस्थेच्या स्वच्छता मैत्रिणींमार्फत कचरा ओला व सुका असा विलगीकरण करून गोळा करण्यात येईल. शहरात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार आहे.

महापालिका क्षेत्रातील भाजी बाजारमधील घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, फेरीवाले, फ्रूटस्टॉलधारक व सर्व व्यावसायिक, तसेच शहरांतर्गत सर्व चिकन-मटण दुकानदार, सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ विक्री दुकाने, चायनिज पदार्थ विक्रेते, तसेच लहान-मोठे हॉटेल्स, खानावळी येथील कचरा संकलनाचे काम ‘एकटी’च्या स्वच्छता मैत्रिणी करणार आहेत. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन, जलवायू परिवर्तन मंत्रालयाकडून घनकचरा नियम २०१६ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकांना त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. शहरातील सर्व मार्केट तसेच हॉटेल्स, खानावळीमधून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. कचऱ्याचे ओला व सुका अशा स्वरूपात सध्या विलगीकरण होत नाही. तसेच, बऱ्याच व्यावसायिकांकडून कचरा उघड्यावरच टाकला जातो. परिणामी, सतत वर्दळ असणाऱ्या ठिकाणांवर कचरा साचून परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरते.

प्रशासनाने रोज शहरांतर्गत निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी सर्व भाजी बाजार, हॉटेल्स, खानावळी तसेच जनरल मटण मार्केटसह इतर मटण- चिकन विक्री दुकानदारांकडे निर्माण होणारा कचरा स्वतंत्ररीत्या ओला व सुका असा विलगीकरण करून उठाव करण्यासाठी  स्थायी समितीच्या ठरावानुसार ‘एकटी’ या सामाजिक व सेवाभावी संस्थेची नेमणूक केली आहे. संस्थेच्या स्वच्छता मैत्रिणींमार्फत कचरा ओला व सुका असा विलगीकरण करून गोळा करण्यात येईल. २९ जून २०१७ ला संस्थेशी करारही केलेला आहे, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. शहरातील सर्व व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायातून निर्माण होणारा कचरा ‘एकटी’ संस्थेच्या स्वच्छता मैत्रिणींकडे देऊन कोष्टकात नमूद केल्याप्रमाणे शुल्क अदा करावे. हा उपक्रम शासन नियमानुसार राबविणेत येत आहे. कोल्हापूर शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी राहण्याच्या दृष्टीने यास शहरातील सर्व व्यावसायिक, व्यापारी वर्गाकडून चांगला प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Web Title: kolhapur news professional garbage collection to ekati organisation