लाच घेताना प्राध्यापक जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

कोल्हापूर - काम दर्जेदार झाल्याचा अहवाल देण्यासाठी ठेकेदाराकडून चार हजारांची लाच स्वीकारताना सोमवारी (ता.8) सायंकाळी एक प्राध्यापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. या प्रकरणी प्रा. शिवाजी तुकाराम काटकर (वय ५५, रा. संकल्प सिद्धी, शांतीनिकेतन शाळेजवळ, मोरेवाडी रोड) याला अटक झाली.

कोल्हापूर - काम दर्जेदार झाल्याचा अहवाल देण्यासाठी ठेकेदाराकडून चार हजारांची लाच स्वीकारताना सोमवारी (ता.8) सायंकाळी एक प्राध्यापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. या प्रकरणी प्रा. शिवाजी तुकाराम काटकर (वय ५५, रा. संकल्प सिद्धी, शांतीनिकेतन शाळेजवळ, मोरेवाडी रोड) याला अटक झाली. तो गव्हर्न्मेंट पॉलिटेक्‍निकमध्ये प्राध्यापक आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ठेकेदार अश्‍पाक मकानदार यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार माळी कॉलनीत त्याला अटक केली.

या विभागाने दिलेली माहिती अशी - फिर्यादी मकानदार यांची नेचर्स कंपनी त्यांच्या पत्नीच्या नावे आहे. टिंबर मार्केटमध्ये त्यांचे दुकान आहे. त्यांना वन विभागाकडून रामलिंग, आळते येथील पर्यटन विकासाचे काम मिळाले होते. ते त्यांनी जानेवारी २०१८ मध्ये पूर्ण केले. संयुक्त वन विकास समिती (आळते)कडे बिल दिलेे. समितीने कामाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी प्रा. काटकरकडे दिली. ‘काम चांगले झाले आहे’, असा अहवाल देतो, पाच हजार रुपये द्या, अशी मागणी त्याने मकानदारांकडे केली. 
दरम्यान, अहवालानंतरही पैसे मिळत नाहीत म्हणून काटकरने पैशांसाठी तगादा लावला. मग मकानदार यांनी तक्रार दिली. 

सायंकाळी प्रा. काटकरला कॉलेजमध्ये पैसे देऊन पकडण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो तेथून माळी कॉलनीत गेला होता. मकानदार यांनी त्याला तेथेच थांबण्यास सांगितले. ते, पंचांसह तेथे गेले. चर्चेअंती चार हजार स्वीकारण्यास तो राजी झाला. तो पैसे घेत असताना ‘लाचलुचपत’ने त्याला अटक केली. काटकरच्या घराची रात्री उशिरा झडती घेण्यात आली. 

Web Title: Kolhapur News Professor arrested in Bribe case