एसटी खड्ड्यात गेली तरी विभाग नियंत्रकांची रजा संपेना !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

एसटीची लक्तरे वेशीवर : त्याच ठिकाणी, त्याच मार्गावरील एसटीचा पुन्हा थरार 
रावते साहेब उठा, या आता कोल्हापुरात 
गेल्या दोन महिन्यात एसटीच्या कारभाराचे 'गैरनमुणे' चर्चेत आहेत. यात नोटाबंदीकाळात परस्पर नोटा बदलल्याच्या आरोपांपासून ते चालक वाहकांच्या ड्युट्या लावण्याताना दुजाभाव, स्थापत्य शाखा वर्कशॉप मधील अफरातफरीचे प्रकार या विषयी सकाळ मधून लेखा जोखा मांडणारी मालिकाही प्रसिध्द झाली. तर पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्याकेड तक्रारी झाल्या. पण विभाग नियंत्रकांची रजा सपंलेली नाही चौकशी झालेली नाही अशात खुळखुळा गाडीतून एसटीचा धोकादायक प्रवास सुरू असल्याने आता, 'रावते साहेब उठा, सायंकाळ झाली., एसटीच्या अपघाताची वेळ झाली,.. तो थांबविण्यासाठी या आता तुम्हीच या कोल्हापुरात' असे म्हणण्याची वेळ एसटी प्रवाशांवर आली आहे.

कोल्हापूर : उमा टॉकीज चौकात अपघात झाला दोघांचा जीव गेला 8 जण जखमी झाले त्याचे पुढे काय झाले, विभाग नियंत्रक रजेवर गेले, खुळाखुळा झालेल्या एसटी गाड्यातून धोकादायक प्रवास शहरातून होतो कसा, नोटा बंदीच्या काळात कांही आगारात नोटांच्या संख्येत तफावत आली त्याचे काय झाले, जुन्या एसटीला कमकवूत सुटेभाग जोडले पण बिले चांगल्या दर्जाच्या पार्टस घेतली गेली कशी, मध्यवर्ती बसस्थानकावरून रात्री दहानंतर मुंबईला गाड्या बंद का केल्या, तीन वर्षा पेक्षा अधिक काळ एकाच विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या अडविल्या कोणी, अशा एसटी महामंडळातील गलथान कारभाराबाबतच्या कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर सध्या 'विभाग नियंत्रक रजेवर आहेत' एवढेच मिळत आहेत. 

गेल्या दोन महिन्यापासून एसटी महामंडळाचा गलथान कारभारच्या विदारक कथा आणि तक्रारी पालकमंत्री, जिल्हाधिकारींच्या पर्यंत गेल्या पण त्यावर पुढे कार्यवाही काय झाली याचे उत्तर कोणच देत नाही. तरीही शहरातील वाढत्या वर्दळ ववाहतुकींची कोंडीत जुन्या एसटी गाड्यातून धोकादायक स्थितीत प्रवासी वाहतुक होते. दोघाचा जीव जातो त्यांच ठिकाणी त्याच मार्गावरील एसटीला दुसऱ्यांदा अपघात सदृष्य दुसरी घटना घडते. लोकांची पून्हा जीव जाण्याची स्थिती येते. तरीह सर्व यंत्रणा चिडीचिपू आहेत. पालकमंत्र्यांनी चौकशी आदेश देऊनही जिल्हाधिकाऱ्यांनी काय केले हे कोणालाच माहिती नाही, तक्रारदार आमच्या तक्रारींचे काय झाले विचारून थकले पण चौकशी सुरू झाली नाही. 

एसटी महामंडळाचे मुुंबईतील मुख्यालयातील अधिकारी निद्रीस्त असल्यासारखी स्थिती आहे 'जे घडतय ते कोल्हापूरात, आपल्याला काय त्याते नंतर बघू' असा समज करून तेही कार्यालयात हवा खात आहेत. तर विभाग नियंत्रक 'वरून कधी चौकशी यायची तेव्हा येवो तो पर्यंत आक्‍टोबर महिना येईल आपण सेवा निवृत्त होऊ झाले नंतर काय होते ते बघू तो पर्यंत हक्काची रजा काढून रजेच्या संरक्षणात राहू करू. त्यासाठी चर्चेत ठेवावाचे मुलाचे लग्नाचे कारण, प्रत्यक्षात अर्जावर पाय दुखीचे कारण अशी 'नव' 'निती' अवलंबत गेली दिड महिना एसटी विभाग नियंत्रक रजेवर आहेत. विभाग नियंत्रक पदावर प्रभारी अधिकाऱ्यांकडे आहेत त्याचे थोड अवघड काम आले की विभाग नियंत्रक रजेवर आहेत एवढे उत्तर देत आहेत. 

या सगळ्या गदोरोळात एसटीचा पून्हा उमाटॉकीज चौकात रॉड तुटला थरार उडाला. यातून एसटीच्या कमकुवत गाड्या हेच कारण चर्चेत आले. या अपघातातील चालक कृष्णा डवरी यांनी प्रसंगावधान राखून गाडी बाजूला घेतली गंभीर अपघात टळला त्यांचे कौतुक करायलाही विभाग नियंत्रक रजेवर आहेत हेच पालुपद लावले आहे. एसटीच्या गलथान कारभाराची लक्तरे टांगली तरीही एसटीचे विभाग नियंत्रक रजेवर गेले इथ पासून ते एसटीच्या बिघडत्या कारभाराला पालकमंत्री, जिल्हाधिकारी ते विभाग नियंत्रक सगळ्याच पातळ्यांवर असलेली उदासिनता एसटीला खड्ड्यात घालणारी आहे. एसटीला सध्या वाली कोण असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

Web Title: kolhapur news public transport ST bus issues