पुजारी कायद्याचा मार्चपूर्वी अध्यादेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

कोल्हापूर - अंबाबाई मंदिरासह पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीतील सर्व मंदिरांसाठी पगारी पुजारी कायदा असेल. त्याबाबतचा अहवाल विधी व न्याय विभागाने तयार केला असून, दोन दिवसांत सचिवांशी चर्चा केली जाईल. प्रसंगी मार्चपूर्वी पगारी पुजारी कायद्याबाबत अध्यादेश काढण्याचीही शासनाची तयारी असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. अंबाबाई मंदिरामध्ये पगारी पुजारी नेमावेत, या मागणीसाठी आंदोलन तीव्र झाल्यानंतर पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात कायद्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र हिवाळी अधिवेशनात या विषयावर चर्चा झालीच नाही. या पार्श्‍वभूमीवर अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीने आज त्यांची भेट घेतली.
Web Title: kolhapur news pujari law