मी महाजन; तरी संस्कार मुंडेंचेच - पूनम महाजन

मी महाजन; तरी संस्कार मुंडेंचेच - पूनम महाजन

कोल्हापूर - मी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या असले तरी माझ्यावर संस्कार झालेत ते गोपीनाथ मुंडे यांचे, अशी कबुली भाजपच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. 

दोन दिवसांच्या पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या महाजन यांनी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. बैठकीत ठरलेल्या वेळेपेक्षा त्या अर्ध्या तास उशिरा आल्या, त्याचा संदर्भ घेऊन त्या म्हणाल्या, ‘‘मी महाजन असल्याने वेळेवर पत्रकार परिषदेला येईल अशी तुमची अपेक्षा असेल. मी जरी प्रमोद महाजन यांची कन्या असले तरी माझ्यावर मुंडेंचे संस्कार आहेत. मी वडिलांनंतर राजकारणात आले. त्यापूर्वी माझा आणि पक्षाचा फारसा संबंध नव्हता. २००६ पासून मी पक्षात सक्रिय झाले. २०१४ मध्ये पहिल्यांदा खासदार झाले.’’

त्या म्हणाल्या, ‘२०१६ मध्ये माझ्यावर युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिली. देशात युवतींचा वाटा ५०  टक्के आहे. त्यांची मते जाणून घेण्यासाठी वर्षभरात देशातील २४ राज्यांचा दौरा केला. युवक-युवतींशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा काय आहेत, सरकारची धोरणे काय असावीत हे त्यांच्याकडून जाणून घेतले.’’

‘झेंडा लगाओ, दंडा खाओ’ अशी पूर्वी युवा मोर्चाची अवस्था होती. आज देशातील ६५ टक्के भूभागात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आता युवा मोर्चाला चांगले दिवस आले. युवा मोर्चाची नेहमीच निवडणुकीची तयारी असते. आताचा हा दौरा त्याचा भाग असला तरी त्यातून सरकारविषयीचे मत जाणून घेणे हा उद्देश असल्याचे त्या म्हणाल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com