कोल्हापूरात ‘सीबीएस’ परिसरात दोन गट भिडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

कोल्हापूर - मध्यवर्ती बस स्थानक (सीबीएस) परिसरात रात्री दोन गट एकमेकांस भिडले. त्यांना पांगवण्यासाठी गेलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानास जमावाने मारहाण केली तर पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने दोन्ही गट पसार झाले. रात्री उशिरापर्यंत परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त होता. 

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी - यादवनगर परिसरातील दोन गटात वादावादी झाली. याच वादावादीतून रात्री अकराच्या सुमारास दोन गट आमने-सामने आले. त्यांच्यात बघता बघता हाणामारी सुरू होती. त्यामुळे परिसरातील नागरिक, हातगाडी व्यावसायिक भयभीत झाले. त्यांनी आरडाओरड व पळापळ सुरू केली. त्यामुळे तणावात भर पडली. याठिकाणी बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिस कर्मचारी व होमगार्ड विजय जाधव यांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार जमावातील काही जणांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितला. काहीच मिनिटात तेथे एक मोठा गट दाखल झाला. त्यात महिलांचाही समावेश होता. त्या गटाने थेट होमगार्ड विजय जाधव यांना मारहाण केली. बंदोबस्ताला असणाऱ्या एका पोलिसालाही जमावाने धक्काबुक्की केली. 

दरम्यान, याची माहिती शाहूपुरी पोलिसांना समजली. तसा पोलिसांचा फौजफाटा मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दाखल झाला. त्यांना पाहून दोन्ही गटातील तरुणांसह महिला तेथून पसार झाल्या. त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून करत होते. घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील सर्व हातगाड्या पटापट बंद झाल्या. 

Web Title: Kolhapur News quarrel in CBS area