काैटुंबिक वादातून सासुरवाडीकडून जावयास मारहाण

राजेंद्र होळकर
मंगळवार, 29 मे 2018

इचलकरंजी - कौंटूबिक कारणातून एका तरुणाला त्यांच्या सासुरवाडीच्या मंडळीनी काठी आणि गजाच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. इस्माईल इब्राहीम इनामदार (वय 30, रा.इंदुमती हायस्कूल शेजारी) असे जखमीचे नाव आहे. ही मारहाणीची घटना काल रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली असून, त्यांची पोलिसात नोंद झाली आहे.

इस्माईल इनामदार यांचे कबनूर येथील काडाप्पा मळ्यातील तरुणीसोबत विवाह झाला आहे. गेल्या काही दिवसापासून इस्माईल आणि त्यांच्या पत्नीच्यामध्ये कौंटूबिक कारणातून वाद होत होते.  याच वादातून काल रात्री त्याला सासुरवाडीकडील मंडळीनी बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डोक्‍याला मोठा मार लागला आहे. तसेच यावेळी त्यांच्या आईलाही धक्काबुक्की करण्यात आली आहे. याप्रकरणी सासरा दस्तगिर हानिफ शेख, चुलत सासरा नबीलाल शेख, नातेवाईक मन्सुर शेख (तिघे रा. काडाप्पा मळा, कबनुर), मकबुल मुल्ला (रा.पेठवडगाव) याच्या विरोधी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

Web Title: Kolhapur News quarrel incidence in Ichalkaraji