म्हणतोय गवा...असाच माणूस हवा...!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 मे 2017

सकाळी सहापासूनच मोहिमेसाठी अभयारण्याकडे कोल्हापूरकरांनी धाव घेतली. स्वच्छता करण्यासाठी आवश्‍यक सर्व सुरक्षेची साधने 'सकाळ'ने उपलब्ध केली होती. तालुक्‍यातील विविध संस्था व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध क्‍लब, तरुण मंडळे, महिला बचत गट व मंडळे, तनिष्का समन्वयक व सदस्यांसह यंग इन्स्पिरेटर नेटवर्कचे (यिन) सभासद विद्यार्थी अशा सर्वांनीच या मोहिमेला प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठबळ दिले. सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

राधानगरी : जागतिक वारसास्थळांमध्ये नोंद असलेल्या दाजीपूर-राधानगरी अभयारण्याच्या स्वच्छतेसाठी सलग दुसऱ्या वर्षी आज हजारो कोल्हापूरकर एकवटले. तीन तासांच्या श्रमदानातून तब्बल आठ टन काचेच्या बाटल्या आणि सहा टनांहून अधिक प्लॅस्टिक संकलित झाले. सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकाराने झालेल्या या मोहिमेत स्वच्छतेसाठी तीन पिढ्या एकवटल्या. 

गेल्या वर्षी या मोहिमेदरम्यान तब्बल साठ टन कचरा गोळा झाला होता. या वर्षी हे प्रमाण त्यातुलनेत सुमारे पंचवीस टक्‍क्‍यांहून कमी आल्याचे सकारात्मक चित्र पुढे आले. जंगलाच्या आतील भागांत कचऱ्याचे प्रमाण नगण्य असून, मुख्य रस्त्याच्या दुतर्फा काही ठिकाणी हा कचरा आढळला. आजच्या स्वच्छता मोहिमेनंतर हा परिसर चकाचक झाला आणि 'म्हणतोय गवा-असाच माणूस हवा' असा संदेश यानिमित्ताने मिळाला. 

सकाळी सहापासूनच मोहिमेसाठी अभयारण्याकडे कोल्हापूरकरांनी धाव घेतली. स्वच्छता करण्यासाठी आवश्‍यक सर्व सुरक्षेची साधने 'सकाळ'ने उपलब्ध केली होती. तालुक्‍यातील विविध संस्था व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध क्‍लब, तरुण मंडळे, महिला बचत गट व मंडळे, तनिष्का समन्वयक व सदस्यांसह यंग इन्स्पिरेटर नेटवर्कचे (यिन) सभासद विद्यार्थी अशा सर्वांनीच या मोहिमेला प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठबळ दिले. सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी सर्वांचे आभार मानले. 

श्रीमंत शाहू छत्रपतींचा सहभाग 
मोहिमेत श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासह खासदार संभाजीराजे, मधुरिमाराजे छत्रपती यांनीही सहभाग नोंदवला. आमदार प्रकाश आबिटकर, राधानगरीच्या प्रांत मनीषा कुंभार, पोलिस निरीक्षक सूर्यकांत सुर्वे, पंचायत समितीचे सभापती दिलीप कांबळे, उपसभापती रविश पाटील आदींसह विविध बत्तीसहून अधिक संस्थांचा सहभाग होता.

Web Title: Kolhapur News radhanagari abhayaranya radhanagari wildlife sanctuary sakal esakal