भटकंतीतून पर्यटनाचा आनंद - मिलिंद गुणाजी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

राधानगरी - ‘‘पर्यटनाला परदेशात जाण्यापेक्षा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भटकंती केल्यास पर्यटनाचा आनंद मिळतो. भटकंती करताना चमत्कार पाहायला मिळतात. यामध्ये मानवी, नैसर्गिक चमत्कारही पाहायला मिळतात. झाडांवर चमकणारे हजारो काजवे पाहिले की हा निसर्गाचा चमत्कारच वाटतो. निसर्गाची अनुभूती घेत असताना निसर्गाला धोका पोचणार नाही, याची खबरदारी पर्यटकांनी घेतली पाहिजे,’’ असे प्रतिपादन अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी केले.

ते राधानगरी पर्यटन महोत्सवातील ‘काजवा महोत्सवा’च्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मिलिंद गुणाजी व अभिनेत्री हेमल इंगळे यांच्या हस्ते झाडाला पाणी घालून महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. काळम्मावाडी रस्त्यावर या महोत्सवाचे आयोजन केले होते.

बायसन नेचर क्‍लबचे सम्राट केरकर यांनी काजवा महोत्सवाबाबत माहिती दिली. अभिजित तायशेटे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ‘निसर्गगाणी’ हा संगीत कार्यक्रम झाला. रात्री उशिरापर्यंत काजवे पाहण्यात पर्यटक दंग झाले होते. यावेळी तहसीलदार शिल्पा ओसवाल, सरपंच कविता शेट्टी, पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर उपस्थित होते.

पर्यटकांतून समाधान व्यक्त
काजवे पाहण्यासाठी पर्यटकांना पाच बसेसची मोफत सोय केली होती. यामधून सर्वांनी काजवा महोत्सवाचा आनंद घेतला. काळोख्या रात्री झाडांवर लुकलुकणारे काजवे पाहून प्रत्येकाला महोत्सवाला आल्याचे समाधान वाटत होते.

Web Title: Kolhapur News Radhanagari Tourism Festival