राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

कोल्हापूर- जिल्ह्यात संततधार सोमवारी मध्यरात्रीपासून संततधार सुरुच आहे. जिल्ह्यातील सर्व पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून मंगळवारी साडेबाराच्या सुमारास राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडले.

कोल्हापूर- जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून संततधार सुरुच आहे. सर्व पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडले.

राधानगरी धरणातून भोगावती नदीमध्ये प्रतिसेकंद 12 हजार 200 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. भोगवती व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कसबाबावडा येथील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. 

जिल्ह्यातील पाटगाव क्षेत्रात गेल्या 24 तासात 113 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पाटगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणातून 1909 क्‍युसेक्‍स ने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वेदगंगानदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली असून नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  
 

Web Title: kolhapur news radhanagri dam gates open

टॅग्स