कर्जमाफीच्या ११२ कोटींसाठी २२ पासून बेमुदत उपोषण : रघुनाथदादा पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

कोल्हापूर - काँग्रेस सरकारने जाहीर केलेले कर्जमाफीचे ११२ कोटी रुपये ‘नाबार्ड’ने तत्काळ परत करावेत, २० जानेवारीपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली नाही, तर २२ जानेवारीपासून पुण्यातील ‘नाबार्ड’च्या कार्यालयासमोर शेतकरी संघटनेतर्फे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी दिला.  

श्री. रघुनाथदादा पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील ४४ हजार ६५९ शेतकऱ्यांना ११२ कोटी ८९ लाख रुपयांची पीक कर्जमाफी मिळाली होती. यात खासदार राजू शेट्टी, सदाशिवराव मंडलिक यांनी तक्रार केल्याने ही रक्कम परत गेली होती. शेतकरी संघटनेने याबाबत उच्च न्यायालयात दाद मागितली होती. हा निकाल शेतकरी संघटनेच्या बाजूने लागला आहे. त्यानंतर ‘नाबार्ड’ने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. या वेळी सर्वोच्च न्यायालयानेही ‘नाबार्ड’चे अपील फेटाळले. त्यामुळे ‘नाबार्ड’ने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ११२ कोटी रुपये परत द्यावेत. मागील सरकारने जाहीर केलेली रक्कम परत जाण्याची एकमेव घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. त्यामुळे प्रामाणिक शेतकरी वंचित राहिले आहेत. केवळ राजकारणामुळे ही रक्कम परत गेली. ‘नाबार्ड’नेही आपला हेका सोडावा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही रक्कम परत केली पाहिजे.

माणिक शिंदे, अजित पाटील, गुणाजी शेलार, बाळासाहेब मिरजे, राजू खुर्दाळे, संभाजी चौगले, धोंडिराम गुरव, अदम मुजावर उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Raghunathdada Patil Press