डॉक्‍टर अरुण पाटील याच्यासह चौघा आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

राजेंद्र होळकर
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

इचलकरंजी - कुमारी माता व विधवा महिलांच्या अर्भकांना बेकायदेशिरपणे विक्री केल्याचे प्रकरणी अटक केलेल्या येथील होमिपॅथीक डॉक्‍टर अरुण पाटील याच्यासह चौघा आरोपीना पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्यांना आज न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली.

इचलकरंजी - कुमारी माता व विधवा महिलांच्या अर्भकांना बेकायदेशिरपणे विक्री केल्याचे प्रकरणी अटक केलेल्या येथील होमिपॅथीक डॉक्‍टर अरुण पाटील याच्यासह चौघा आरोपीना पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्यांना आज न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे या चौघांची रवानगी कोल्हापूरातील कारागृहामध्ये करण्यात आली.

न्यायालयीन कोठडी सुनावल्याच्यामध्ये आरोपी डॉक्‍टर अरुण पाटील, त्याची पत्नी उज्वला पाटील (दोघे रा.जवाहरनगर, इचलकरंजी), अभियंता अनिल दशरथ चहांदे, त्यांची अभियंता पत्नी प्रेरणा चहांदे (दोघे.रा.नवरगाव, ता. शिंदेवाडी, जि.चंद्रपूर) या चौघाचा समावेश आहे.

आरोपी डॉक्‍टर अरुण पाटील याच्या हॉस्पीटलमधून कुमारी मातेच्या चार दिवसाचे अर्भक विक्री करतानाचा एक फोटो केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या फोटोमध्ये आरोपी डॉक्‍टर अरुण पाटील, त्याची पत्नी उज्वला पाटील व अर्भक विकत घेतलेले व सध्या पोलीस कोठडीत असलेले अभियंता अनिल दशरथ चहांदे, त्यांची अभियंता पत्नी प्रेरणा चहांदे (दोघे.रा.नवरगाव, ता. शिंदेवाडी, जि.चंद्रपूर), संबंधीत अल्पवयीन कुमारी माता आणि अन्य व्यक्ती असे सहा जण दिसत होते. फोटोमध्ये दिसणारी सहावी संबंधीत व्यक्ती ही आरोपी डॉक्‍टर पाटील याची गुरु असल्याचेही पोलीस तपासामध्ये उघड झाले आहे. पण पोलिसांनी त्या संबंधीत गुरुच्या नावाची तपासासाठी गोपनीयता ठेवली आहे.

संबंधीत बातम्या

Web Title: Kolhapur News Raid On Dr Arun Patil Hospital followup