रेल्वे विकासातून व्हावी कोल्हापूरची भरभराट

संदीप खांडेकर
मंगळवार, 10 एप्रिल 2018

कोल्हापूर - चार वर्षांत राजर्षी छत्रपती शाहू टर्मिनसचे रूपडे बदलले असले, तरी पर्यटनवाढीसाठी फलाटांच्या संख्येत वाढ होणे अपेक्षित आहे. अद्ययावत सोयी-सुविधांच्या उपलब्धततेसाठी मॉडेल स्थानक व्हावे, अशी मागणी होत असली तरी त्यास भक्कम पाठबळ मिळालेले नाही. 

कोल्हापूरनगरी नानाविध वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध असल्याने रेल्वेच्या विकासातून येथील वैभवाचे मार्केटिंग व्हावे व भारतीय रेल्वे सप्ताहाच्या निमित्ताने येथील स्थानकाकडून कोल्हापूरकरांशी सोशल कनेक्‍टिव्हिटी वाढावी, असाही मागणीचा सूर आहे.

चार वर्षांत झालेले बदल
 फलाट १, २ व ३ ची वाढली उंची 
 अपघातांचे घटले प्रमाण 
 प्रवाशांना रेल्वेत चढणे झाले सुलभ 
 स्थानकावर अपंगांसाठी उपलब्ध झाले रॅम्प 

तिकिटासाठी सोय, लोकप्रतिनिधींकडून पाहणी
 जनरल तिकिटांसाठी ऑटोमॅटिक मशीन उपलब्ध
 तीन मशीन असल्याने तिकीट केंद्रांवरील रांगा झाल्या कमी 
 स्थानिक लोकप्रतिनिधींकडून स्थानकांची वरचेवर पाहणी
 कर्मचाऱ्यांकडून स्थानकाची चांगल्या प्रकारे स्वच्छता

१९७१ मध्ये स्थानकाच्या मीटरगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले. प्रवाशांच्या अडीअडचणी लक्षात घेत रेल्वे प्रवाशांना सोयी पुरविण्याकडे लक्ष देण्यात आले. कोल्हापूर पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. आता कोल्हापूरच्या रेल्वेस्थानकात भरीव बदल होत आहे. त्याचे कौतुक आहे. कोल्हापूरच्या भरभराटीत रेल्वेचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 
- मोहन शेटे,
निवृत्त रेल्वे अधिकारी

गाड्यांची ये-जा, प्रवाशांची गर्दी

  •  स्थानकावरून २४ तासांत २९ गाड्यांची ये-जा
  •  कर्मचारी, नागरिक, उद्योजक, विद्यार्थी वर्गाचा गाड्यांतून रोज प्रवास 
  •  शाहूपुरी भाजी मार्केट ते फलाट एक दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम ८५ टक्के पूर्ण  निजामुद्दीन एक्‍सप्रेस, अहमदाबाद एक्‍सप्रेसला प्रवाशांची गर्दी

अजून काय व्हावे..? 

  •  फलाटांची संख्या वाढवावी
  •  १२७ वर्षे पूर्ण झालेल्या इमारतीत पावसाळ्यात गळती
  •  पैसे खर्च करून उपयोग होत नाही
  •  अद्ययावत इमारत बांधण्याची प्रवाशांची मागणी
  •  चारही दिशांना गाड्या जाण्यासाठी आराखडा तयार करावा

Web Title: Kolhapur News Railway development needed