कोल्हापुरात संततधार: बहुतांशी धरणांतून विसर्ग सुरु

राजकुमार चौगुले
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

राधानगरीतून 5056 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग

कोल्हापूर: जिल्ह्यात आज (मंगळवार) सर्वदूर पाऊस सुरु होता. पश्‍चिम भागात सातत्याने मध्यम स्वरुपाची संततधार राहिली. तर पूर्व भागातील तालुक्‍यात थांबून-थांबून पावसाच्या हलक्‍या सरी सुरु होत्या. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाळी हवामान तयार झाल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. विशेषत: पश्‍चिमेकडे पावसाचा जोर कायम होता.

मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंयत गगनबावड्यात सर्वाधिक 52 मि.मि. पावसीची नोंद झाली. शाहूवाडीत 27 तर राधानगरीत 17 मि.मि. पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रातही पाऊस सुरु असल्याने बहुतांशी धरणांतून विसर्ग सुरु आहे. पाटगाव, चित्री, चिकोत्रा वगळता अन्य सर्व प्रकल्पातून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. राधानगरीतून सर्वाधिक 5056 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. वारणा धरणातून 1571 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग आहे. संततधार पाऊस सुरु असल्याने काही धरणांतील पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्‍यता पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी व्यक्त केली.

मंगळवारी दुपारपर्यतचा धरणांतून होणारा विसर्ग असा (क्‍यूसेक मध्ये)
वारणा- 5056, तुळशी0 756, वारणा- 1571, दुधगंगा0 525, कासारी 1352, कडवी 186, कुंभी-1250, जंगमहट्टी-140, घटप्रभा- 1625, जांबरे0 156, कोदे ल.पा- 310

Web Title: kolhapur news rain in kolhpur area