कागल तालुक्यातील तीन लघुप्रकल्प भरले

प्रकाश कोकितकर
शुक्रवार, 20 जुलै 2018

सेनापती कापशी - कागल तालुक्‍यातील सहा पैकी तीन लघू प्रकल्प भरले आहेत. तर दोन प्रकल्पांत ५० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा झाला आहे. एक उद्यापर्यंत भरण्याची शक्‍यता आहे. गतवर्षीपेक्षा दोन महिने अगोदर हे प्रकल्प भरले आहेत. जून महिन्याच्या मध्यापासून सुरु झालेल्या समाधानकारक पावसाने चांगलाच दिलासा दिला आहे.

कागल तालुक्‍यात  गुरुवारपर्यंत सरासरी ६१५ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे करंजिवणे(क्षमता ५३ द.ल.घ.फू.), हणबरवाडी(६४) व शेंडूर(२४) हे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तर सोनाळी(३८) ८५ टक्के भरला आहे. पिंपळगाव (२७) ३० टक्के, बेनिक्रे (६३) २७ टक्के भरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही दोन महिने अगोदरची स्थिती आहे.

तालुक्‍यातील करंजिवणे, हणबरवाडी व शेंडूर येथील प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. बेनिक्रे येथे केवळ २७ टक्के साठा झाल्याने पुन्हा एकदा जोतिर्लिंग पाणीवापर संस्थेच्या सिंचन योजनेवरच शेतकर-यांना अवलंबून रहावे लागणार आहे.

झुलपेवाडी प्रकल्प ३७ टक्के भरला
चिकोत्रा खो-याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या झुलपेवाडी प्रकल्पाची १५५२ दशलक्ष घनफूट क्षमता असून यामध्ये ३७ टक्के पाणी साठा झाला आहे. आजपर्यंत धरण क्षेत्रात १४६८ मि.मी. पाऊस झाला. गेल्यावर्षीपेक्षा ही सरासरी चांगली आहे.

Web Title: Kolhapur News Rains and water storage in Kagal Taluka