शाहू छत्रपती शिष्यवृत्ती आता 50 विद्यार्थ्यांना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

कोल्हापूर - राजर्षी शाहू छत्रपती महाराज शिष्यवृत्ती योजनेतून पन्नास विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. पूर्वी दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात होती, आता ही संख्या 50 झाली आहे. अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती आहे. परदेशातील ज्या विद्यापीठांचा पहिल्या तीनशे विद्यापीठांत समावेश आहे अशा विद्यापीठातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळेल. 

शाहू महाराजांनी दलित वर्गाच्या उन्नतीसाठी योगदान दिले त्याची दखल घेत राजर्षींच्या नावानेच शासनाने योजना सुरू केली आहे. 

संबंधित विद्यार्थी अनुसूचित जाती अथवा बौद्ध समाजातील असावा. राज्य शासनाची पूर्वी परदेशी शिक्षणासाठी कोणतीही शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा अधिक नसावे. जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभर विद्यापीठांत शिक्षण घ्यायचे असल्यास अथवा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍सध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाची अट लागू नाही. पदवी, पदव्युत्तर, पदविका अभ्यासक्रम, पीएचडीसाठी 55 टक्के गुण आवश्‍यक आहेत. शिक्षणाचा कालावधी किमान चार वर्षांचा असावा. विद्यार्थी एखाद्या संस्थेत नोकरी करत असेल तर तेथील दाखला द्यावा लागेल. 

कोणत्याही विद्यार्थ्याने कोणत्याही कारणास्तव शिक्षण अर्धवट सोडले तर शिष्यवृत्ती 12 टक्के दराने रक्कम वसूल केली जाईल. अभियांत्रिकीसाठी 25, व्यवस्थापनाच्या सहा, वैद्यकीय तीन अशा 36 या जागा पदवी, पदव्युत्तर, पदविकेसाठी तर डॉक्‍टरेटसाठी सोळा जागा असतील. 

विद्यार्थ्यांची अशीही अडचण 
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून निर्णय झाला खरा, पण शिष्यवृत्तीची प्रवेश प्रक्रिया एप्रिलपासून सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू होते. 31 मेअखेर अर्जाची प्रक्रिया पूर्ण व्हावी लागते. आता जूनची अखेर आली आहे. त्यामुळे अर्ज करायचे कधी आणि ते मार्गी कधी लागणार, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांना पडणार आहे. 

Web Title: kolhapur news Rajarshi Shahu Chhatrapati Shivaji Maharaj's Scholarship Scheme