इचलकरंजी वारणा नळपाणी योजनेस विरोध नाही - खासदार राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

इचलकरंजी - इचलकरंजी शहरासाठी मंजूर केलेल्या वारणा नळपाणी योजनेस आपण कधीच विरोध केलेला नाही. उलट इचलकरंजीकरांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे, यासाठी आपण आग्रही आहे, असे स्पष्टीकरण खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. 

इचलकरंजी - इचलकरंजी शहरासाठी मंजूर केलेल्या वारणा नळपाणी योजनेस आपण कधीच विरोध केलेला नाही. उलट इचलकरंजीकरांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे, यासाठी आपण आग्रही आहे, असे स्पष्टीकरण खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. 

इचलकरंजी शहरासाठी वारणा नळपाणी योजना राबविण्यात येणार आहे. मात्र वारणा काठावरील गावांतून या योजनेला विरोध आहे. कोल्हापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खासदार शेट्टी यांनी आपण शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले होते. त्यामुळे खासदार शेट्टी यांच्या विरोधात नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर खासदार शेट्टी यांनी या योजनेसंदर्भातील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. 

वारणा योजना पूर्णत्वास जाण्यासाठी समन्वयाची गरज असल्याची भूमिका मांडणारा मी पहिला लोकप्रतिनिधी आहे, जेथे वाद असतो, तेथे समन्वय साधला तर वाद संपुष्ठात येतो, या विचाराचा मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. वारणा पाणी योजनेचा प्रश्‍न समन्वयातून सुटणार आहे. यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत

- राजू शेट्टी, खासदार

वारणा नळपाणी योजनेवर बोलण्यापेक्षा ती पूर्ण कशी होईल, याकडे आपण जास्त लक्ष दिल्याचा दावा श्री. शेट्टी यांनी केला असून वारणा योजनेला माझा विरोध नाही. मात्र गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काहींचा सुरु आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. 

Web Title: Kolhapur News Raju Shetty comment