ऑनलाइन फॉर्म हे शासनाचे नाटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

सोळांकूर - "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी आंदोलने केली. शेवटी त्यावर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली; मात्र अनेक निकष लावले. निकषांत पकडून वंचित ठेवण्याचाच हा प्रकार आहे. सध्या ऑनलाइन फॉर्म भरून घेण्याचे शासन नाटक करत आहे,' असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला. तुरंबे (ता. राधानगरी) येथील सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात बिद्री साखर कारखाना व ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी उपसभापती अजित पोवार होते. 

खासदार शेट्टी म्हणाले, ""बिद्रीच्या निवडणुकीत आघाडीसाठी चर्चेची दारे खुली आहेत. शासनाने कर्जमाफीत निकषांचे कॉलम वाढवून शेतकऱ्याला वंचित ठेवायचे असा प्रकार आहे. सेतू केंद्रावर शेतकऱ्यांची पिळवणूक होते. 200 ते 300 रुपये यासाठी त्यांना द्यावे लागतात. एका बाजूला शासन प्रत्येक सेतुकेंद्रास 100 रुपये देणार म्हणते; मग ही लूट कोण थांबवणार?'' 

ते म्हणाले, ""राज्यातील 48 पैकी 42 खासदार केंद्र सरकारबरोबर आहेत; मात्र यांची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. "न खाऊंगा, न खाने दूंगा' हे विचार पंतप्रधान विसरलेत. म्हणूनच 10 नोव्हेंबरला दिल्लीत जंतरमंतर येथे देशातील 168 संघटना एकत्र करून 10 लाख शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करू. शासकांना वठणीवर आणल्याशिवाय शांत बसणार नाही.'' 

जिल्हाध्यक्ष डॉ. जालंदर पाटील, भगवानराव काटे, अजित पोवार, वासुदेव पाटील, बाळासाहेब पाटील, एकनाथ जठार, सागर कोंडेकर, नितीन पोवार, संतोष बुटाले, इंद्रजित भारमल, शरद मुसळे, प्रकाश पाटील उपस्थित होते. 

माणूस ओळखायला चुकलो... 
"बिद्रीत सत्तेत गेलात, तर भ्रष्टाचारावर वॉच ठेवा. काटामारीला लगाम घाला. चोराला सामील होऊ नका. आमचा एक माणूस मंत्रिमंडळात शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी पाठविला; मात्र तो त्यांचाच झाला. मला तो माणूस ओळखता आला नाही, ही माझीच चूक झाली. मला अनुभव आला; पण तुम्हाला तसा येऊ नये,' अशा शब्दांत कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर नाव न घेता तोफ डागली. 

आयात वाढविल्यावर हमीभाव कसा? 
कॉंग्रेस सरकार देशात सर्व काही पिकत असतानाही 28 हजार कोटीच्या शेतमालाची आयात करायचे; मात्र मोदी सरकार 1 लाख 40 हजार कोटींची आयात करते; मग शेतीमालाला हमीभाव कसा मिळेल? सध्याचे सरकार पूर्वीच्या सरकारपेक्षा वाईट आहे.

Web Title: kolhapur news raju shetty farmer