रामलिंग परिसरात सामाजिक संघटनांकडून प्लास्टिकमुक्ती उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

इचलकरंजी -  प्राचीन परंपरा लाभलेल्या रामलिंग परिसरात प्लास्टिकमुक्ती उपक्रम राबविण्यात आला. कॅंपस लाईफ युथ फाऊंडेशन (इचलकरंजी), आमचा गाव आमचा विकास ग्रुप (कोल्हापूर) आणि संस्कृती कला अकादमी (आळते) यांनी यामध्ये सहभाग घेतला. यावेळी ट्रेकिंग व "आजचा युवक व सामाजिक भान' या विषयावर कार्यशाळा झाली. यु-ट्यूब चॅनलचे युवा संवादक विष्णू वजार्डे यांनी मार्गदर्शन केले. 

वाढत्या पर्यटकांमुळे या ठिकाणी प्लास्टिक कचरा साठत आहे. यासाठी हा परिसर प्लास्टिकमुक्त होण्यासाठी विविध संघटनांनी प्लास्टिक मुक्तिचा उपक्रम राबविला. संतोष वडेर यांनी परिसराची माहिती देऊन मार्गदशन केले. आजचा युवक व सामाजिक भान या विषयावर बोलताना विष्णू वजार्डे म्हणाले, "आजचा युवक दिशाहीन होत असताना समाजाच्या व निसर्गाच्या स्वच्छतेसाठी पुढे येणारे हात पाहिले की मनस्वी आनंद होतो.'' 

या उपक्रमामधे रामलिंग ते अल्लमप्रभू पदभ्रमंती देखील करण्यात आली. उपक्रमास आळते गावचे पोलिस पाटील रियाज मुजावर यांचे सहकार्य लाभले. शितल शिंदे, प्रभाकर पाटील, अभय अबदान, विकास पाटील, सतिश ठोंबरे, दिपक पाटील  उपस्थित होते. 

"सकाळ' आणि संवाद सामाजिक मंडळच्या संकल्पनेतुन सुरु झालेल्या या उपक्रमास सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच सकाळ समूहाने याविषयी केलेले प्रबोधन खूप महत्वाचे ठरत आहे. वेगळेगळ्या संस्था उत्स्फूर्तपणे उपक्रम राबवित आहेत. त्यामुळे रामलिंग परिसर प्लास्टिकमुक्त होण्यास मदत होत आहे. 

- संतोष वडेर, अध्यक्ष, संस्कृती कला अकादमी, आळते. 

Web Title: Kolhapur News Ramling free form Plastic event