ईद मुबारक...!

ईद मुबारक...!

कोल्हापूर - देशात सुख, समृद्धी नांदावी, हिंदू-मुस्लिम ऐक्‍य कायम राहावे, यंदा भरपूर पाऊस पडू दे, अशी प्रार्थना करत मुस्लिम बांधवांनी आज रमजान ईद साजरी केली. मुस्लिम बोर्डिंगसह विविध मशिदींमध्ये नमाज पठण झाले. यावेळी ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा परस्परांना देण्यात आल्या. तसेच अन्य समाजबांधवांची गळाभेट घेऊन ईदचा आनंद अधिक द्विगुणित झाला. 

राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंती आणि ईद एकाच दिवशी आल्याने आजच्या दिवसाला विशेष महत्त्व होते. दसरा चौक येथील शाहू महाराजांच्या पुतळ्याला समाजबांधवांनी अभिवादन केले. मुफ्ती ईशाद कुन्नरे यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण झाले. त्यानंतर खिर वाटप आणि विविध उपक्रमांचे आयोजन झाले.

महापौर हसीना फरास, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, माजी महापौर आर. के. पोवार, राजू लाटकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, तसेच वसंतराव मुळीक आदींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर, कादर मलबारी, रफीक मुल्ला, हमजेखान सनदी, अल्ताप झांजी, साजिद खान, मलिक बागवान, जहाँगीर अत्तार आदींनी शुभेच्छा स्वीकारल्या. 

मुस्लिम बोर्डिंगसह अकबर मोहल्ला, बाराईमाम, बडी मसजीद, शाहूपुरी, सदर बझार, वर्षानगर जमादार कॉलनी, शिरद मोहल्ला आदी ठिकाणी सामूहिक नमाज पठण झाले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, नगरसेवक सत्यजित कदम यांनीही शुभेच्छा दिल्या. 

दरम्यान, आज दिवसभर मुस्लिम बांधवांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी विविध समाजबांधवांनी गर्दी केली.

मुस्लीम पंचायतीतर्फे रमजान ईद व शाहू जयंती साजरी झाली. गवंडी मोहल्यात या निमित्ताने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

पंचायतीचे अध्यक्ष फारूक कुरेशी यांनी रमजान ईद व मानवता यावर विचार मांडले. पोलिस उपनिरीक्षक मनिषा गबाळे यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. शिरीष काटकर, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे उपस्थित होते. शाहू महाराजांच्या आदर्श आदर्श विद्यमान राज्यकर्त्यांनी घ्यावा असे आवाहन कुरेशी यांनी केले. अस्लम शेख, आयुब शेख, मुबारक मुल्ला, लियाकत शेख, उमर मेस्त्री, ॲड. गौस महात, नासिक सय्यद, समीर गवंडी आदि उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com