‘राणादा’चा जीव रंगला शाहूपुरी पोलिस ठाण्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

कोल्हापूर -‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी ऊर्फ ‘राणादा’ टीमसोबत शनिवारी रात्री दहाच्या सुमारास शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला. पोलिस ठाण्यात चक्क राणा आल्याचे पाहून पोलिस, अधिकाऱ्यांसह तक्रारदारांनीही त्याला पाहण्यासाठी गर्दी केली.

‘तुझ्यात जीव रंगला’चे चित्रीकरण सध्या वसगडे (ता. करवीर) येथे सुरू आहे. त्यासाठी हार्दिक जोशीसह अन्य कलाकार कोल्हापुरात आले आहेत. ते सर्व जण सध्या रुईकर कॉलनी येथे राहतात. शूटिंगबरोबर इतर कार्यक्रम संपवून जोशी सहकाऱ्यांसह सायंकाळी घरी गेले. मात्र, रात्री दहाच्या सुमारास ते व त्यांचे सहकारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात मोटारीतून आले.

सध्या अनेकांच्या मनात घर करून राहिलेले जोशी ऊर्फ ‘राणा’ चक्क शाहूपुरी पोलिस ठाण्यात आल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्याला पाहण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीही त्याच्या भोवती गर्दी केली. जोशी थेट पाठीमागील बाजूंनी पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या कक्षात गेले. तेथे मोरे यांनी त्यांचे स्वागत केले. मात्र, जोशी यांनी प्रसारमाध्यमांना ही औपचारिक भेट आहे. कृपया फोटो काढू नका असे सांगितले. यानंतर मात्र दीर्घकाळ त्यांची मोरे यांच्याशी चर्चा सुरू होती.

Web Title: kolhapur news ranada visited shahupuri police station

टॅग्स