कठोर मनाचा ‘माणूस’ रणजित गोहिरे

संदीप खांडेकर
शुक्रवार, 11 मे 2018

कोल्हापूर - मृतदेह अपघातातला असो किंवा विष प्यायलेल्या व्यक्तीचा. तो आल्याची वर्दी मिळताच रणजित तुकाराम गोहिरे  शवविच्छेदन विभागाकडे धाव घेतात. हातात ग्लोव्हज व अंगावर ॲप्रन चढवून ब्लेडने मृतदेहाच्या विच्छेदनाचे काम सुरू करतात. या विभागाकडे पाऊल उचललं तरी सर्वसामान्यांच्या काळजात धस्स होतं.

कोल्हापूर - मृतदेह अपघातातला असो किंवा विष प्यायलेल्या व्यक्तीचा. तो आल्याची वर्दी मिळताच रणजित तुकाराम गोहिरे  शवविच्छेदन विभागाकडे धाव घेतात. हातात ग्लोव्हज व अंगावर ॲप्रन चढवून ब्लेडने मृतदेहाच्या विच्छेदनाचे काम सुरू करतात. या विभागाकडे पाऊल उचललं तरी सर्वसामान्यांच्या काळजात धस्स होतं. गोहिरे यांचं मात्र या विभागाशी जोडलेले ‘सेवेचं कनेक्‍शन’ कठोर मनाच्या माणसाचं ढळढळीत उदाहरण आहे. बावीस वर्षांत हजारो मृतदेहांचे विच्छेदन केल्याचे ते सांगतात.

सासऱ्यांच्या पावलावर पाऊल...
गोहिरे हे संभाजीनगरमधील शाहू हाउसिंग सोसायटीत राहतात. एस. एम. लोहिया हायस्कूलमधून त्यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतले. वयाच्या विसाव्या वर्षी ते सीपीआरमध्ये वार्ड बॉय म्हणून नोकरीस लागले. त्यांचे सासरे कराडमध्ये शवविच्छेदन विभागात नोकरीस होते. गोहिरे कराडला गेल्यानंतर शवविच्छेदन विभागात गेले होते. संतप्त सासऱ्यांनी त्यांना तेथून जाण्यास सांगितले. 

कोल्हापुरात परतल्यानंतर त्यांच्या डोक्‍यात आपणही शवविच्छेदन करायला शिकले पाहिजे, असा विचार डोक्‍यात घोळू लागला. सीपीआरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी त्याबाबत सांगितले. तसेच एक आठवड्याचे प्रशिक्षणही घेतले. सीपीआरमध्ये १९९८-९९ पासून त्यांनी हजारो मृतदेहांचे विच्छेदन केले आहे. त्यांचा मुलगा शुभम हाही त्यांच्याच वाटेवर चालत आहे.

एका दिवसात १७ मृतदेहांचे विच्छेदन
आईचे निधन असो, की भावाचा मृत्यू मनच इतकं कठोर झाले आहे, की डोळ्यातून अश्रूही येत नाहीत, असेच ते सांगतात. यंदा २७ जानेवारीला १६ मृतदेहांचे विच्छेदन त्यांनी केले. विभागाच्या परिसरात मृतांचे नातेवाईक रडत होते. आपण मात्र स्तब्धच होतो, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

कधी कुणाचा मृतदेह शवविच्छेदन विभागात येईल, याची वेळ सांगता येत नाही. पत्नीचे ऑपरेशन असताना अशीच वेळ आली होती. त्या वेळी तिच्याकडे जायलाही मिळाले नाही. डॉक्‍टरांनीच तिचे ऑपरेशन करून मला धीर दिला.
- रणजित गोहिरे 

Web Title: Kolhapur News Ranjeet Gohire special story