रंकाळ्यावर महिन्यातून होणार दोनदा स्वच्छता मोहीम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

कोल्हापूर - सकाळ माध्यम समूह आणि महापालिकेच्या पुढाकाराने गेल्या महिन्यात झालेल्या ‘चला, मातीचा वारसा जपूया’ या मोहिमेंतर्गत पहिला टप्पा म्हणून २२ हून अधिक वारसास्थळांची स्वच्छता झाली. आता याच वारसास्थळांच्या ठिकाणी लोकसहभागातून विविध कृतिशील कार्यक्रमांवर भर दिला जाऊ लागला आहे. रंकाळ्यावर सकाळी फिरायला येणाऱ्या मंडळींनी ‘रंकाळा ग्रुप’ या नावाने व्हॉटस्‌ॲप ग्रुप स्थापन केला असून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि चौथ्या रविवारी हा ग्रुप रंकाळा परिसराची स्वच्छता करणार आहे. 

ऐतिहासिक भवानी मंडप, अंबाबाई मंदिर, रंकाळा, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, धुण्याची चावी, जैन मठ, पंचगंगा घाट आदी २२ वारसास्थळांवर झालेल्या स्वच्छता मोहिमेतून तब्बल ५२ टन कचरा संकलित झाला होता. त्यात १९ टन प्लास्टिक आणि ३३ टन काचेच्या बाटल्यांचा समावेश होता. या पार्श्‍वभूमीवर आपापल्या परिसरातील वारसास्थळावर महिन्यातून काही विशिष्ट दिवशी एकत्रित येऊन स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्प अनेकांनी केला आहे. महापालिकेच्या पुढाकाराने नुकतीच भवानी मंडप फलकमुक्त करण्याची कारवाई झाली. रंकाळ्यावर महिन्यातून दोनदा स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून त्याचा प्रारंभ गेल्या रविवारी झाला. 

रंकाळ्यावर दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे प्लास्टिकचा कचराही वाढतो आहे. महापालिकेच्या वतीने कचरा संकलन केला जातो व उठाव केला जातो; मात्र अनेकदा महापालिकेची यंत्रणा तोकडी पडते. त्यामुळे येथेही लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.

Web Title: kolhapur news rankala social media