#waterpollution रंकाळ्याच्या पाण्यातील घटकांचे करणार पृथक्करण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

कोल्हापूर - रंकाळा तलावातील मोठे कासव मृतावस्थेत आढळल्याने महापालिकेच्या पर्यावरण विभागाने आज रंकाळा तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाकडून या पाण्यातील घटकांचे पृथक्करण करण्यात येणार आहे.

कोल्हापूर - रंकाळा तलावातील मोठे कासव मृतावस्थेत आढळल्याने महापालिकेच्या पर्यावरण विभागाने आज रंकाळा तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाकडून या पाण्यातील घटकांचे पृथक्करण करण्यात येणार आहे. त्यातून कासवाचा मृत्यू कशामुळे झाला? याचे कारण समजल्यानंतर उपाययोजना करणे शक्‍य होणार आहे. 

महापालिकेचे पर्यावरण विभागप्रमुख समीर व्याघ्रांबळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह रंकाळा तलावाच्या तांबट कमानीच्या परिसरात पाण्याचे नमुने घेतले. याच परिसरात दोन दिवसांपूर्वी एक मोठे कासव मृतावस्थेत सापडले होते. रंकाळा तलावाचे पाणी प्रदूषित झाले असते, तर त्याचा परिणाम अन्य जलचरांवर जाणवला असता. मासे मोठ्या प्रमाणात मृत झाले असते, पण केवळ एकच मोठे कासव मृतावस्थेत आढळल्याने ते कशामुळे घडले, या कारणाचा शोध महापालिका घेणार आहे. यासंदर्भात ‘रंकाळा तलावात काही तरी बिघडले आहे.’ अशा आशयाचे वृत्त आज ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते.

 

Web Title: Kolhapur News Rankala water pollution issue