रंकाळा शुद्धीकरण प्रकल्प गुंडाळला

डॅनियल काळे
सोमवार, 23 जुलै 2018

कोल्हापूर - रंकाळा शुद्ध करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर आयसीटी संस्थेने पतौडी खणीवर सुरू केलेला प्रकल्प महापालिकेचे सहकार्य नसल्याने बंद झाला. या प्रकल्पासाठी पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांच्या संस्थेने सर्व यंत्रणा पतौडी खणीवर सुरू केली होती. रंकाळ्याचे पाणी पिण्यासारखे करून दाखवू, असे डॉ. यादव यांनी सांगितले होते. त्यासाठी महापालिकेने केवळ वीज द्यायची होती. पण, दरमहा विजेचे बिल तीस हजार रुपये येऊ लागल्याने महापालिकेने हा प्रकल्पच बंद केला.

शुद्धीकरणाची ही योजनाही रखडली आहे. दरमहा वीजबिल भरण्यास महापालिकेने असमर्थता दाखविल्याने हा प्रकल्प बंद पडला.

रंकाळा कोल्हापूर शहराचे वैभव आहे. पण, या तलावाला प्रदूषणाचा फटका बसला आहे. प्रदूषणामुळे रंकाळ्यातील पाणी तर प्रदूषित झालेच, पण अनेक समस्या रंकाळ्याने सहन केल्या आहेत. रंकाळा शुद्ध करण्याचे अनेक प्रयोग महापालिकेने केले. त्यावर कोट्यवधींचा खर्च झाला. पण, रंकाळा काही स्वच्छ झाला नाही.

दोन वर्षांपूर्वी आयसीटी संस्थेचे डॉ. जी. डी. यादव कोल्हापुरात आले. त्यांनी रंकाळ्याच्या या कामासाठी त्यांच्या संस्थेकडून प्रकल्प उभारण्याचे संकेत दिले. तत्कालीन महापालिका अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याशी चर्चा झाली. श्री. देसाई आणि त्यांचे संबंध चांगले असल्याने यादव यांनी विनामोबदला हा प्रकल्प येथे कार्यान्वित केला होता. वर्षभर हा प्रकल्प सुरू होता. 

अपेक्षेप्रमाणे साथ नाही
मुंबईस्थित आयसीटीचे प्राचार्य आणि कोल्हापूरचे पुत्र जी. डी. यादव यांनी खाणीतील पाणी स्वच्छ करून दाखविले. महापालिकेचा एक रुपयाही न घेता माजी विद्यार्थी संघटना असलेल्या संस्थेने प्रदूषणाच्या खाईत सापडलेली खाण मुक्त केली. आजही खाणीचे पाणी स्वच्छ आहे. डॉ. यादव यांनी रंकाळ्याचे पाणी पिण्यायोग्य करून दाखवू, असे सांगितले. मात्र, त्यांना अपेक्षेप्रमाणे साथ मिळाली नाही.

साडेचार कोटी पाण्यात
ब्ल्यू ग्रीन अलगीमुळे रंकाळ्याच्या पाण्याला उग्र वास येत होता. पाण्यावर हिरव्या रंगाचा थर साचून होता. उन्हाळ्यात ब्ल्यू ग्रीन अलगीचा प्रादुर्भाव सुरू होतो. त्यामुळेच पाणी हिरवेगार झाल्याचा दावा केला जात आहे. महापालिकेकडे तज्ज्ञ अभियंता आणि अधिकाऱ्यांची फौज असताना ज्यांनी ड्रेनेज लाईनच्या कामाचे डिझाईन केले, त्यांनी काम पूर्ण झाल्यानंतर त्याची चाचणी घेतली का?, तसे असेल तर प्रदूषण का थांबले नाही, साडेचार कोटी रुपये पाण्यात का गेले? असा प्रश्‍न पडला आहे.

दृष्टिक्षेपात रंकाळा...

  •  रंकाळ्याचे क्षेत्र अडीचशे एकर
  •  तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे 
  • तलावातील गाळ निघाला 
  •  श्‍याम सोसायटी, सरनाईक कॉलनीतील 
  • सांडपाणी तलावात
  •  ड्रेनेजसाठी साडेचार कोटींचा खर्च
Web Title: Kolhapur News Rankala water pollution issue