कोल्हापूर जिल्ह्यात ७५ टक्के गुऱ्हाळघरे बंद

कोल्हापूर जिल्ह्यात ७५ टक्के गुऱ्हाळघरे बंद

सोनाळी -  कोल्हापूरच्या गुळाची ख्याती सातासमुद्रापार नेणाऱ्या गुऱ्हाळघरांपुढे अनेक समस्या उभ्या आहेत.  यंदा जास्त पावसाचा फटका बसल्यामुळे ऊस पिकात मोठी घट होणार आहे. विविध अडचणींमुळे जिल्ह्यात जवळजवळ ७० ते ७५ टक्के गुऱ्हाळघरे बंद आहेत. हा व्यवसाय वाचविण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेण्याची गरज आहे.

ऊस उत्पादनातील घट, व्यापाऱ्यांची मनमानी, मजुरांची कमतरता, विविध रोगांचा प्राद्रुभाव, गुळ तयार करण्यासाठी खरेदी कराव्या लागणाऱ्या साहित्यांचा किंमतीत झालेली वाढ, बॅंकांचा कर्जासाठी तगादा आदी कारणामुळे गुऱ्हाळघर मालक मेटाकुटीला आले आहेत. विविध संघटनां व कारखानदारांकडून ऊस दराचा तिढा सुटल्याने गुऱ्हाळघरांचा हंगाम लवकर संपण्याची शक्‍यता आहे.

अनेक रोगांमुळे उस उत्पादनात ३० ते ४० टक्के घट होण्याची बीती व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी ऊस क्षेत्रात वाढ झाली होती. पण यावर्षी अनेक रोगांचा व जास्त पावसामुळे ऊसाची उंची वाढली नाही. त्यामुळे ऊसाचे वजन घटणार आहे. मार्केटमधील गुळाचे सौदे अचानक बंद केल्याने गुळा दर्जा ढासळला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच गुऱ्हाळ मालक तोट्यात जातात. तसेच गुळ साठवणुकीच्या व्यवस्थापनात अनेक त्रुटी आहेत. 

काही चालकांनी गुऱ्हाळघरे चालू करण्यासाठी ७ ते ८ लाख रुपयांची गुंतवणूक केली असून, यामधून तोटाच होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे. सध्या गुऱ्हाळ घरावर काम करणाऱ्या मजुराला दिवसाला २२५ ते २३५ रुपये मजुरीबरोबरच दोन किलो गुळ द्यावा लागतो. गुऱ्हाळघर मालकाचा विचार केल्यास एक आदणाला सुमारे १८०० ते २००० हजार रुपये खर्च येतो.

या हिशोबाचा विचार केल्यास शेतकऱ्यांचा गुळ सहा हजाराच्या आसपास विकला गेला तरच ऊस शेती परवडेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या गुळाचा असणारा ३७०० ते ४२०० रुपयांचा दर शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. गेल्या तीन वर्षांपासून गुऱ्हाळ घरावर काम करण्यासाठी मजुरांची कमतरता भासत आहे. काही ठिकाणी पुरुषांची जागा महिलांनी घेतली असल्याचे दिसून येत आहे. काही शेतकरी विविध अडचणींचा विचार करून इतर पिकांकडे वळत आहेत. 

वीज प्रश्‍न गंभीर
सतत खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे गुऱ्हाळ मालक अडचणीत आले आहेत. मुळातच मनुष्यबळाची कमतरता असताना वीज नसल्याने आहे त्या मजुरांना बसून रहावे लागत आहे. डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे डिझेलवर गुऱ्हाळघर चालवणेही शक्‍य होत नाही. यामुळे वीज वितरण कंपनीने याचा विचार करायला हवा.

३७०० ते ४२०० रुपये दर गुऱ्हाळघर मालकांना न परवडणारा आहे. वीज, मजुरांचा पगार व इतर खर्च वजा जाता गुऱ्हाळ मालकांना हा दर तोट्याचा आहे. त्यामुळे सरासरी ५५०० ते ६००० रुपये दर दिला तरच गुऱ्हाळघरे सुरू राहतील. अन्यथा गुऱ्हाळघरे कायमची बंद करावी लागतील.
- आनंदा पाटील, मालक, सोनाळी.

शेतीला लागणारी खते, बिबियाणे, नांगरट, पाणी, मशागत, मनुष्यबळ आदी खर्च शेतकऱ्यांना जास्त भरल्याने गुळाला ६००० पर्यंत दर मिळाला तरच शेतकऱ्यांना शेती करणे परवडते.
- कुंडलिक पाटील, शेतकरी, हसूर दुमाला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com