ठराव झाला तरी रस्ते मनपाच्या ताब्यात देण्यास बांधिल नाही 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

कोल्हापूर - राज्य महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरीत करुन घेण्याचा ठराव महापालिकेत झाला तरी तो ठराव झाला म्हणून रस्ते महापालिकेच्या ताब्यात देण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग बांधील नाही, असे आज वरिष्ठ सुत्रांनी "सकाळ'ला सांगितले. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, "महापालिका ठराव करु शकते; पण त्यांनी ठराव केला म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे आपली मालमत्ता लगेच महापालिकेकडे दिलीच पाहिजे, असा कायदा नाही आणि नियमही नाही.' 

दरम्यान रस्ते हस्तांतर ठराव झाला की, लगेच रस्ते महापालिकेकडे येणार आणि त्यापाठोपाठ त्या रस्त्यावरील दारु दुकाने, बार सुरु होणार असे भासवून ठराव केला जात आहे. ठरावावर आपल्या व्यवसायाचे भवितव्य असल्याने काही व्यावसायिक ठरावाला अनुकूल आहेत; पण ज्यांना या ठरावातील किंवा शासकीय यंत्रणेतील खाचाखोचा माहित आहेत, असे अनेक मोठे व्यावसायिक ठरावावर अवलंबून नाहीत. आणि ते ठरावासाठी आपला शब्द देण्यासही तयार नाहीत. त्यातही जर हा ठराव झालाच तर त्यातील अंतरंग माहित असल्याने या ठरावाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंमलबजावणी होऊ नये, अशीच यंत्रणा राबविली जाण्याची शक्‍यता आहे.

Web Title: kolhapur news road pwd