टवाळखोरांपासून रक्षण करणारे पोलिस अन् विद्यार्थिनींचे अनोखे रक्षाबंधन

बाळासाहेब कांबळे
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

हुपरी (जि . कोल्हापूर) : परिसरात कठोर कारवाई करून सडक सख्या हरींचा बंदोबस्त करणार्‍या हुपरी पोलिस ठाण्यातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी राख्या बांधून रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. यामुळे पोलीसांसह उपस्थित भारावून गेले.

हुपरी (जि . कोल्हापूर) : परिसरात कठोर कारवाई करून सडक सख्या हरींचा बंदोबस्त करणार्‍या हुपरी पोलिस ठाण्यातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी राख्या बांधून रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. यामुळे पोलीसांसह उपस्थित भारावून गेले.

येथे शाळा, कॉलेज, बस स्थानक आदी ठिकाणी टवाळखोरांकडून महिला, तरुणी व विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार होत होते. दोनच महिन्यांपूर्वी हुपरी पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून कार्यरत झालेल्या सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी या प्रकाराना चांगलाच पायबंद घातला. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना विश्वासात घेत शाळा, कॉलेज परिसरात रेंगाळणार्‍या रोमिओंना पोलिसी कारवाईचा हिसका दाखविला. या धडक कारवाईचा टवाळांनी धसकाच घेतला आहे. त्यामुळे छेडछाडीच्या प्रकाराला आळा बसला आहे. 

या पार्श्वभूमीवर रक्षाबंधनचे औचित्य साधून येथील चंद्राबाई शेंडूरे महाविद्यालय, पारिसाण्णा इंग्रोळे ज्युनियर कॉलेज लक्ष्मीदेवी गर्ल्स शाळेच्या विद्यार्थिनींनी सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्यासह उपनिरीक्षक एस. एम. पाटील व सर्व पोलिसांना राख्या बांधल्या . व सडक सख्या हरीं बद्दल उघडलेल्या मोहिमे बद्दल समाधान व्यक्त केले.

पोलिस ठाण्याच्या आवारात हा कार्यक्रम झाला. सौ. शोभा मधाळे, ऋतुजा कांबळे, विश्रांती कांबळे, राखी कांबळे, पद्मजा ठोंबरे, दीपा कांबळे, तनूजा कंगणे यांनी उपक्रमात सहभाग घेतला. प्रणित मधाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य आनंदराव कांबळे, अमोल कुरणे, अविनाश कांबळे, रवींद्र कांबळे, किशोर कांबळे आदी कार्यकर्त्यानी पुढाकार घेतला. 

Web Title: kolhapur news road romeos girls police raksha bandhan