गडहिंग्लजच्या मंदिरातील चोरीचा छडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

इचलकरंजी - गडहिंग्लज येथील श्री काळभैरी मंदिरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यास येथील स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले. पथकाने रेकॉर्डवरील दोघांकडून चोरीतील ५ किलो १०० ग्रॅम वजनाची चांदी व ६ ग्रॅम ९ मिली वजनाचे सोन्याचे दागिने असा सुमारे २ लाख १९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही माहिती पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

अटक केलेल्यांमध्ये सिद्धनाथ सुदाम गायकवाड (वय ३५, रा. गोरेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली), सूरज तानाजी काळे (२६, नवीन मालधक्का झोपडपट्टी, दौंड, जि. पुणे) यांचा समावेश आहे. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी दिली.

चोरटाच आटणी कारागीर
मंदिरातील चोरीप्रकरणी रेकॉर्डवरील दोघांना अटक केली. सिद्धनाथ गायकवाड हा चांदी आटणीचा कारागीर असल्याचे उघड झाले आहे. त्यानेच चांदीच्या दागिन्यांची घरातील चांदीच्या आटणीमध्ये वितळवून त्याची वीट केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.

श्री. नरळे म्हणाले, ‘‘चोरीमध्ये मूर्तीच्या अंगावरील लाखो रुपयांचे चांदीचे व सोन्याचे दागिने लंपास केले होते. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी चोरीचा कसून तपास करण्याबाबत पथकाला आदेश दिले होते. पोलिस उपनिरीक्षक अमोल माळी, कॉन्स्टेबल महेश कोरे, वैभव दड्डीकर, ज्ञानेश्‍वर बांगर, राजू पट्टणकुडे, रणजित पाटील, संजय फडतरे, विजय तळस्कर, सागर पाटील, रवी कोळी, फिरोज बेग, महेश खोत, अजिंक्‍य घाटगे, संदीप मळघणे यांच्या पथकाने गायकवाड व त्याचा साथीदार सूरज काळे यांना अटक केली. त्यांच्याकडे चोरीबाबत चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरलेल्या दागिन्यांची आटणी काढून त्याची वीट करून मित्राकडे ठेवल्याचे सांगितले. 

Web Title: Kolhapur News Robbery in Gadhinglaj temple