चला... ‘रॉयल कोल्हापूर हॉर्स शो’ला..

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

कोल्हापूर - येथील कोल्हापूर इक्वेस्टेरियम असोसिएशनतर्फे आजपासून पोलो मैदानावर ‘रॉयल कोल्हापूर हॉर्स शो’ला सळसळत्या उत्साहात प्रारंभ झाला. शोसाठी राज्यभरातून अश्‍वशौकिनांनी उपस्थिती लावली. विविध प्रकारांत अश्‍वांची चपळता आणि त्यांचा दिमाखदार डौल काय असतो, याची प्रचिती येथे मिळते. त्याशिवाय हॉर्स रायडर्सचे कसबही पणाला लागले. 

कोल्हापूर, पुणे, मुंबई, अकलूज येथील आठ शाळांचे विद्यार्थी यात सहभागी झाले. त्याशिवाय प्रोफेशनल हॉर्स रायडर्सचाही सहभाग आहे. जम्पिंग अरेना, जिमखाना अरेना, टेन्ट पेगिंग आदी साहसी प्रकार त्यांच्याकडून अनुभवायला मिळतो. हॉर्स रायडिंग हा क्रीडा प्रकार नव्या पिढीला समजावा, यासाठी जुन्या काळातील छायाचित्रांचे प्रदर्शन येथे भरवले आहे. 

दरम्यान, एअर मार्शल अजित भोसले यांच्या हस्ते शोचे उद्‌घाटन झाले. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, प्रवीणसिंह घाटगे, तुषार घाटगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. असोसिएशनचे अध्यक्ष वीरेंद्रसिंह घाटगे, उपाध्यक्ष प्रशांत सुर्वे, सचिव अच्युत करांडे, सोनल करांडे, प्रशिक पाटेकर, शोहब शेख, रसिका जनवाडकर आदींनी संयोजन केले. 

आजच्या शोमधील अनुक्रमे विजेते असे -
 शो जंपिंग टॉप स्कोअर (खुला) ः कईस दलाल (जॅपलूप), स्वप्नील साने (ए. के. स्पोर्टस्‌), विनायक करनावर (अकलूज), के. व्ही. सिंग (जॅपलूप), अमर खराडे (पुणे)  पोल बेंडिंग (चिल्ड्रेन) ः चेतन मेंडिगिरी, प्रेम रूनवाल (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल), वंश जोगनी (जॅपलूप)  सो जंपिंग (ज्युनियर) ः कशिश बजाज, निहारिका मणियार, करिश्‍मा जोसी (सर्व जॅपलूप), रोहित थोरात (अकलूज)  पोल बेंडिंग (ज्युनियर) ः अमर खराडे, कशिश बजाज, राजाराम चौधरी (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) 
 शो जंपिंग (चिल्ड्रेन) ः अनिरुद्ध मोहिरे (ए. के. स्पोर्टस्‌), 
रोहन करमरकर, आयान शेख, मैथिली देशमुख (जॅपलूप).

Web Title: Kolhapur News Royal Kolhapur Horse Show