नृसिंहवाडी नदीपात्रात भाविकांच्या सुरक्षेसाठी रबरी इनरची सोय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

नृसिंहवाडी - येथील कृष्णा नदीपात्रात देवस्थानच्या पुढाकाराने स्नाना करता येणाऱ्या भाविकांसाठी नदीपात्रात रबरी इनर त्वरीत तैनात केल्या आहेत . "सकाळ'च्या वृत्ताची दखल घेऊन देवस्थानने स्नानासाठी सुरक्षेची उपाययोजना व व्यवस्था केली आहे. 

दत्त मंदिर परिसरामध्ये अधिक महिन्यात भाविकांची गर्दी असते. यावेळी दत्तदर्शनापूर्वी काही भाविक असुरक्षित स्नान करतात. काहींना पोहता येत नाही असे भाविकही नदीपात्रात स्नानासाठी उतरतात. अशा भाविकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात यासंदर्भात "सकाळ' मध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल दत्त देवस्थान मंदीर प्रशासनाने घेतली व पोहता न येणाऱ्या भाविकांसाठी नदी पात्रात पन्नासहून अधिक रबरी इनर घाटावर उपलब्ध करून दिल्या आहेत. दत्त देवस्थानच्या पुढाकाराने अध्यक्ष विकास पुजारी, प्रा. गुंडू पुजारी यांनी या कामी पुढाकार घेतला. याबद्दल भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. 

Web Title: Kolhapur News rubbery inner security in Narsobawadi