शेतकऱयांसाठी 32 वर्षे घरावर तुळशीपत्र ठेवलेः सदाभाऊ खोत

राजकुमार चौगुले
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

कोल्हापूर: यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसास नियमानुसार मिळणाऱ्या एफआरपी पेक्षा अधिक 300 रुपये पहिला हप्ता मिळावा, अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज (शनिवार) इचलकरंजी येथे केली. रयत क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून 32 वर्षे घरावर तुळशीपत्र ठेवून काम केले, असेही खोत म्हणाले.

कोल्हापूर: यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसास नियमानुसार मिळणाऱ्या एफआरपी पेक्षा अधिक 300 रुपये पहिला हप्ता मिळावा, अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज (शनिवार) इचलकरंजी येथे केली. रयत क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून 32 वर्षे घरावर तुळशीपत्र ठेवून काम केले, असेही खोत म्हणाले.

साखरेचे दर चांगले असल्याने यंदा आंदोलनाची वेळच येणार नाही. यामुळे अवास्तव दर न मागता आम्ही व्यवहार्य पहिला हप्ता मागत आहोत. यामुळे हा दर आम्ही मिळवणारच असा निर्धार श्री. खोत यांनी यावेळी व्यक्त केला. श्री. खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर नाव न घेता टीका केली. यंदा साखरेचे उत्पादन मागणी पेक्षा कमी होणार आहे. यामुळे यंदा उसाला चांगला पहिला हप्ता मिळणारच आहे. या दरावरच समाधान न मानता सी रंगराजन समितीच्या अहवालानुसार 70:30 फॉर्म्युला साठी लढा उभारला जाईल, असे श्री खोत यांनी सांगितले.

पहिल्यांदा निवेदन देऊन संवाद साधायचा. कारखानदारांनी नाही मानले तर मात्र आंदोलन करण्याचा इशारा श्री खोत यांनी दिला. यावेळी जेष्ठ अभिनेते राहुल सोलापुरकर, आमदार सुरेश हाळवणकर, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, अशोक स्वामी, पुंडलिक जाधव आदी उपस्थित होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील, दसरा महोत्सव समिती अध्यक्ष मोहन माने यांनी संयोजन केले.

सदाभाऊ खोत यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे...
- 3 ऑक्टोम्बर पासून राज्यात उडित डाळ विक्री केंद्र सुरू करणार...
- कर्ज मुक्तीमुळे या वर्षीची दिवाळी शेतकरी धडाक्यात साजरी करणार...
- शरद पवार यांचे नावाने ओरडून राजकारण केले...
- लंकापती यांनी बाहेर येऊन रयत क्रांती कुठे चालली आहे हे पाहावे...
- राजू शेट्टी याचे नाव न घेता कृषी मंत्री यांच्यावर टीका...
- शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून 32 वर्षे घरावर तुळशीपत्र ठेवून काम केले...
- शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर बलिदान देण्याची तयारी ठेवा...
- माझा मंत्रिपदाचा राजीनामा फक्त शेतकरी मागू शकतील बाकी कोणालाही याचा अधिकार नाही...
- या वर्षी उसासाठी शेतकऱ्याला उसाचे आंदोलन करावे लागणार नाही...
- FRP प्लस 300 रुपये असा यावेळी उसाचा अंतिम पहिला हप्ता राहणार
- उसाचे वजन काटे तपासणार...
- प्रारंभी निवेदन देऊया व न ऐकल्यास आंदोलन उभा करू...
- कर्ज माफीची मुदतवाढ 15 ऑक्टोबर करावी...
- वस्त्रोद्योग धोरण जाहीर करावे...
- कोल्हापुरात खंडपीठ झाले पाहिजे
- या सह अन्य ठराव यावेळी मांडण्यात आले...
- 02079401428 या नंबर मिस कॉल द्या व सभासद व्हा.

Web Title: kolhapur news sadabhau khot dasara melava in ichalkaranji