मी पळालो नाही, पळवून लावले - खोत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - मी पळणारा कार्यकर्ता नाही, त्यामुळे पळून जाण्याचा प्रश्‍नच येत नाही. मला हाकलून काढले आहे, पळवून लावले आहे, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांना लगावला. पळवून नेणारे अनेकजण आहेत; पण पळून जाणाऱ्यांचा हा दोष आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली होती, त्याला खोत यांनी या भाषेत प्रत्युत्तर दिले. 

खोत यांनी आज माजी आमदार महादेवराव महाडिक यांची कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखान्यावर भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 
खोत म्हणाले, ‘‘मी पळून गेलोच नाही. ज्यांची पात्रता नाही त्यांच्यासमोर मला चौकशीला बोलावले. मीही ताठ मानेने या चौकशीला पुढे गेलो. नंतर माझी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे पळून जाण्याचा विषयच नाही.’’
नव्या संघटनेच्या प्रतिसादाबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘नव्या संघटनेची घोषणा केल्यानंतर मी अनेकांशी संपर्क साधला. काहींना प्रत्यक्ष जाऊन भेटलो. अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’

Web Title: kolhapur news sadabhau khot statement