‘एमबीबीएस’ प्रवेश विनाडोनेशन - डॉ. तुषार देवरस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

कोल्हापूर - देशभरात विनाडोनेशन ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेता येते. मात्र पालक व विद्यार्थ्यांना याबाबतची फारशी माहिती नसल्याने देशभरात ‘विदाऊट डोनेशन ॲडमिशन’ अभियान राबवत असल्याचे एस्टूट करिअर कौन्सिलिंग ॲकॅडमीचे अध्यक्ष डॉ. तुषार विनोद देवरस यांनी सांगितले. 

सकाळ विद्या आणि एस्टूट ॲकॅडमीतर्फे झालेल्या ‘कमी गुण असूनही भारतात आणि विदेशात ‘एमबीबीएस’मध्ये खात्रीशीर प्रवेशाचा गुरुमंत्र’ या विषयावर आयोजित मोफत सेमिनारमध्ये ते बोलत होते. येथील केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या या सेमिनारला विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त गर्दी केली.

यंदा ‘एमबीबीएस’ करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दोन लाखांनी वाढ झाली असून जागा मात्र कमी आहेत. या पार्श्‍वभूमीवर कमी गुण असूनही ‘एमबीबीएस’साठी चांगल्या महाविद्यालयात  प्रवेश कसा मिळवावा, याबाबत डॉ. देवरस यांनी विस्तृत विवेचन केले.

ते म्हणाले, ‘‘अकरावीचा अभ्यासक्रम पुढील वाटचालीसाठी अतिशय महत्त्वाचा असून ‘एमबीबीएस’ व ‘एमडी’साठी भारतासह वीसहून अधिक देशांत खात्रीशीर प्रवेश मिळू शकतो. भारताच्या तुलनेत अमेरिकेतील ‘एमबीबीएस’ शिक्षण कमी खर्चाचे आहे. केवळ गुण चांगले मिळून चालत नाही तर प्रवेश प्रक्रियेची प्रोसेस आणि स्ट्रॅटेजीस विद्यार्थ्यांना समजायला हवी. त्यासाठी ‘एस्टूट’ विशेष प्रयत्न करते. विद्यार्थ्यांतील कौशल्य आणि क्षमतांचा विकास करण्यासाठीही प्रयत्न केले जातात.’’

देशात असो किंवा परदेशात प्रवेशाची खात्री देताना ‘एस्टूट’ने कुठल्याही विद्यापीठ किंवा कॉलेजशी कसलाही करार केलेला नाही. कायद्याच्या चौकटीत राहूनच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिला जातो. कुठल्याही कॉलेजला शासनाच्या चौकटीतच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागते, असेही डॉ. देवरस यांनी सांगितले. दरम्यान, प्रेरणा शहा यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Kolhapur News sakal Vidya event