शिवजयंती सोहळा 19 फेब्रुवारीस राजधानी दिल्लीत - खासदार संभाजीराजे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राजधानी दिल्ली येथे १९ फेब्रुवारी (सोमवारी) साजरी केली जाणार आहे. हा आपल्या सर्व शिवभक्तांसाठी अभिमानाचा व गौरवाचा क्षण आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

या कार्यक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार, विचार, इतिहास व राष्ट्राच्या जडघडणीत असलेली महाराजांची भूमिका, त्यांची शासन व्यवस्था, न्याय व्यवस्था व सामाजिक धोरण संपूर्ण देशभरात पोहोचविण्याचा मानस आहे. सर्व शिवभक्तांनी या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने राजधानी दिल्ली येथे उपस्थित रहावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहनही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

Web Title: Kolhapur News Sambhaji Raje Press