कोल्हापूर-मुंबई विमानसेवा येत्या २४ डिसेंबरपासून - खासदार संभाजीराजे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

कोल्हापूर -  गेली सहा वर्षे बंद असलेली कोल्हापूर मुंबई प्रवासी विमानसेवा येत्या २४ डिसेंबरपासून पुन्हा सुरु होणार आहे. ही सेवा दर मंगळवारी, बुधवारी व रविवारी असणार आहे.

कोल्हापूर -  गेली सहा वर्षे बंद असलेली कोल्हापूर मुंबई प्रवासी विमानसेवा येत्या २४ डिसेंबरपासून पुन्हा सुरु होणार आहे. ही सेवा दर मंगळवारी, बुधवारी व रविवारी असणार आहे. या विमानसेवेचे तिकीट बुकिंग गुरुवारपासून सुरु होत असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील व एयर डेक्कनच्या अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे खासदार संभाजीराजे यांना आज सांगितले.

एयर डेक्कनची ही विमानसेवा मुंबईवरून दुपारी १.१५ वाजता कोल्हापूरसाठी विमान उडान भरणार असून दुपारी २.३० वाजता ते कोल्हापूरला पोहोचणार आहे. तसेच याच दिवशी दुपारी ३.२५ वाजता कोल्हापूरवरून हे विमान मुंबईसाठी उडान भरणार असून सायंकाळी ४.४० वाजता मुंबईला पोहोचणार आहे.

कोल्हापूर विमानतळ हा फार वर्षापासून रखडलेला विषय होता तो मार्गी लावण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांची खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भेट घेवून ही सुरु होण्यामध्ये असलेल्या काही अडचणीवर चर्चा केली होती. तसेच कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी विमानतळ सुरु होणे अत्यंत गरजेचे आहे याबाबतचे निवेदन ही खासदार संभाजीराजे यांनी त्यांना दिले होते. त्यावेळी नागरी वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना  ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्यावर योग्य ते उपाय करण्याचे आदेश दिले होते.

उडाण योजनेमुळे कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून निश्चितपणे  गुंतवणूक वाढेल आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने कोल्हापूर हे महत्वपूर्ण शहर असून या कनेक्टिव्हिटीमुळे मोठा फायदा जिल्ह्याला  होईल. 

- खासदार संभाजीराजे

Web Title: Kolhapur News Sambhajiraje Press