‘आरआयटी’च्या विद्यार्थ्यांनी केली हजार वॉट वीजनिर्मिती

धर्मवीर पाटील
रविवार, 28 मे 2017

आज खनिज तेल, दगडी कोळसा, एल.पी.जी हे ऊर्जास्रोत संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. वायू, सौरऊर्जा या पुनर्निमित करता येणाऱ्या स्रोतांकडे भविष्यात लक्ष देण्याची गरज आहे. पवनचक्कीद्वारे वीजनिर्मिती करणे शक्‍य आहे. जिथे वाऱ्याचा वेग जास्त असतो, तिथे पवनचक्की उभारली जाते. असाच एक यशस्वी प्रयोग येथील ‘आरआयटी’च्या तुषार हसबे, सौरभ बावनेर, नयन मोहितकर, सूरज बैंगणे यांनी केला. महाविद्यालयात लावलेली ही पवनचक्की एक हजार वॉट क्षमतेची आहे. त्यात मुख्यतः पाते, मुख्य कणा, गिअर पेटी, जनित्र यांचा उपयोग केला आहे. पवनचक्की वाऱ्याच्या दिशेला फिरेल, अशी व्यवस्था आहे.

राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी १००० वॉट क्षमतेची वीजनिर्मिती पवनचक्की ऊर्जेवर तयार केली. त्याचा वापर सध्या दोन प्रयोगशाळांत सुरू आहे. शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या तुषार हसबे, सौरभ बावनेर, नयन मोहितकर, सूरज बैंगणे यांनी पुढाकार घेतला. पवनचक्कीचा उपयोग दैनंदिन केला जातो, हे या प्रयोगातून सिद्ध केले.

दिवसेंदिवस संपत चाललेल्या ऊर्जास्रोताला पर्यायी ऊर्जा या कल्पनेतून आरआयटीच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. दैनंदिन जीवनात किंवा कारखान्यांत करायला लागलो तर ऊर्जेचा प्रश्न ही सुटेल आणि खनिज इंधने जास्त वर्ष वापरता येईल, ही त्यामागची भूमिका आहे. उंच ठिकाणी, जिथे वाऱ्याचा वेग जास्त आहे, अशा ठिकाणी पवनचक्की स्थापित करू शकतो. शिवाय आजूबाजूला असणाऱ्या ठिकाणीही पवनचक्की ऊर्जेवर वीजनिर्मिती शक्‍य आहे, हे या प्रकल्पामधून सिद्ध होते. यासाठी इलेक्‍ट्रिकल विभागाचे डॉ. एच. टी. जाधव यांनी प्रोत्साहित केले. प्रकल्पासाठी लागणारे आर्थिक भांडवल मिळवण्यासाठी टेक्विप फंडाची मदत मिळाली. 

प्रकल्पासाठी ठिकठिकाणी हवेचा वेग ‘Anemometer’ या उपकरणाद्वारे मोजला. जमिनीपासून ८० मीटरवर इलेक्‍ट्रिकल विभागाच्या इमारतीवर हवा तसा वायूचा वेग ४.८ m/s मिळाला. तो १ kw जनरेटरद्वारे विद्युतनिर्मिती करण्यासाठी पुरेसा होता. हा वायूचा वेग स्थिर राहत नाही. तो हवामानानुसार कमी जास्त होतो. पवनचक्की उभारण्यासाठी लागणारा पोल आणि स्टॅंड तयार करण्यासाठी १८ फूट लांबीचा पोल घेतला. त्यानंतर विद्युत निर्मितीसाठी लागणारा १ kw क्षमतेचा अलटरनेटर ऊर्जा तयार करण्यासाठी घेतला. 

कॉलेजमधेच खराब अवस्थेत उपलब्ध होता, तो तज्ज्ञांच्या सल्ल्याने दुरुस्त केला. पात्यांद्वारे उपलब्ध  वायुवेगाने जास्तीत जास्त वीजनिर्मितीसाठी त्याच्या  विविध डिझाईन्सचा अभ्यासून ते पाते वर्कशॉपमध्ये ‘हॅंड ले अप मेथड’ने तयार केले. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढून पोलच्या १२ फूट लांबीला ६ रोपचा सपोर्ट दिला. त्या पोलला तयार केलेले स्टॅंड वेल्डिंग करून घेतले.  स्टॅंडला फासनरद्वारे बेस वर फिक्‍स करून घेतले. अलटरनेटरला पाते जोडल्यानंतर ते अलटरनेटर पोल वर बसवले. त्यानंतर ३ फेस वायर खाली लॅबमध्ये असलेल्या चार्ज कंट्रोलरला जोडले. पाते फिरल्यानंतर अलटरनेटरद्वारे १२ वोल्ट Ac रेटेड ऑउटपुट मिळते ते चार्ज कंट्रोलद्वारे ४८ वोल्ट Dc ध्ये कन्वर्ट होऊन बॅटरीत स्टोर केल्या. आणि त्याचा सप्लाय UPS सिस्टम द्वारे MESB कडून येणाऱ्या सप्लायला दिला. बॅटरीत साठवलेली ऊर्जा दोन प्रयोगशाळा म्हणजेच  तिथले सगळे फॅन, लाईट, मशिन्स चालवण्यासाठी करू शकतो. पवनऊर्जेद्वारे विद्युतनिर्मिती करून त्याचा वापर दैनंदिन जीवनात करू शकतो, हे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. एच. टी. जाधव, प्रा. एम. एन. राव, प्रा. सी. एल. भट्टार, ए. एन. जाधव, डि. ए. सावंत यांनी मदत केली आहे. प्राचार्य डॉ. एस. एस कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Kolhapur News Sangli News Windmill RIT college Innovation